राज्य सरकारने देशाची माफी मागत वाझेंची नार्को टेस्ट करावी  - BJP leader Ram Kadam criticizes the state government | Politics Marathi News - Sarkarnama

राज्य सरकारने देशाची माफी मागत वाझेंची नार्को टेस्ट करावी 

सरकारनामा ब्यूरो
रविवार, 14 मार्च 2021

वाझे यांच्या अटकेनंतर आता भाजप आणखी आक्रमक झाला आहे.

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या "अँटिलिया' निवासस्थानासमोर स्फोटकांनी सापडलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) आज अटक केली. वाझे यांच्या अटकेनंतर आता भाजप आणखी आक्रमक झाला आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांची नावे समोर येण्यासाठी वाझे यांची नार्को टेस्ट केली जावी, अशी मागणी भाजपचे नेते राम कदम यांनी केली आहे. 

राम कदम यांनी ट्वीट करत म्हणटले आहे की ''गृहमंत्री अनिल देशमुख जी सचिन वाझे यांची ताबडतोब नार्को टेस्ट करा. होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी. मी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. कर नाही त्याला डर कशाला पाहिजे. वाझे यांची नार्को टेस्ट झाली नाही तर ठाकरे सरकारचा खरा चेहरा लोकांसमोर येईल'', असे राम कदम यांनी म्हटले.

यशवंत सिन्हांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला अन् त्यांचे पुत्र जयंत म्हणाले...

''मुख्यमंत्री यांच्याकडे आमची मागणी आहे त्यांचे सरकार सचिन वाझेचे प्रवक्ता असल्याप्रमाणे वागत होते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते है संपूर्ण देशाने पाहिले. अखेर त्याला एनआयएने अटक केली आता तरी महाराष्ट्र सरकार देशाची माफी मागत सचिन वाझेची नार्को टेस्ट करणार का?'' असा सवलाही राम कदम यांनी उपस्थित केला आहे. 

दरम्यान, एनआयए संस्थेकडून वाझे यांची सुमारे 12 तासांहून अधिक काळ त्यांची चौकशी करण्यात आली. अशी अटक होण्याची शक्यता खुद्द वाझे यांना होतीच. त्यामुळेच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. तसेच आपल्यावरील जुन्या खटल्याची जखम दाखवत जग सोडून जाण्याचीही भाषा त्यांनी काल केली होती.  

देवेंद्र फडणवीसांवर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी 
 

वाझेंच्या व्हॉट्‌सऍप स्टेट्‌सने खळबळ

सचिन वाझे यांनी शनिवारी खळबळजनक व्हॉट्‌सऍप स्टेटस ठेवले होते. त्यात त्यांनी जग सोडण्याची भाषा केली होती. 3 मार्च 2004 ला सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली होती. ती केस अजूनही अनिर्णित आहे. मात्र, आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने गोवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्षे होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्षे आहेत ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली, असे वाझे यांनी व्हॉट्‌सऍप स्टेटसमध्ये म्हटले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख