राम कदमांचा सोनिया गांधींना सवाल...''महाराष्ट्रातील कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला समाधान आहे...'' - BJP leader Ram Kadam criticizes Sonia Gandhi | Politics Marathi News - Sarkarnama

राम कदमांचा सोनिया गांधींना सवाल...''महाराष्ट्रातील कोणत्या गोष्टीबाबत तुम्हाला समाधान आहे...''

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 28 एप्रिल 2021

राम कदमांनी व्हिडिओ शेअर करुन सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे.

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीबाबत कॅाग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी आनंद व समाधान व्यक्त केलं आहे, याबाबत भाजपचे नेते राम कदम यांनी सोनिया गांधी टीकास्त्र सोडलं आहे. महाविकास आघाडीवरही राम कदम यांनी टीका केली आहे. राम कदमांनी व्हिडिओ शेअर करुन सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे.

राम कदम म्हणाले की,कॅाग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करीत आहेत. कोणत्या गोष्टीचं त्यांना आनंद आणि समाधान आहे. महाराष्ट्रात हॅास्पीटलच्या दारात तडफडून मृत्यू होत आहेत. जनावरं देखील अशी कोंबत नाही, अशा पद्धतीने एका छोट्याशा अॅम्बुलन्समध्ये २२ जणांची प्रेत एकावर एक ढीग लावून कोंबली जात आहेत. एकाच बेडवर प्रेत आणि मृत्यूशी झुंज देणारा कोरोनाचा रुग्ण यांच्यावर उपचार सुरु आहे. 

''काही ठिकाणी अॅाक्सिजन, रेडमेसिविरचा तुटवडा आहे. काही ठिकाणी सरकाच्या हलगर्जीपणामुळे आग लागून लोकांचे मृ्त्यू या महाराष्ट्राच्या भूमीत होत आहेत.  या गोष्टीचे त्यांना समाधान आहे. कोणत्या गोष्टीचं त्यांना समाधान आणि आनंद आहे. यापूर्वी सचिन वाझेसारख्या लोकांना पकडून महाराष्ट्रात तीन पक्षाचं सरकार वसुली वसुली खेळ खेळत होतं. महिन्याला शंभर कोटी रुपये वसुल केलं पाहिजे, अशा गोष्टी समोर आल्या. त्या वसुली -वसुली खेळाचं समाधान सोनियाजींना आहे का... कोणत्या गोष्टीचं त्यांना समाधान आहे. याचं उत्तर सोनियाजींना द्यावे लागेल, असे राम कदम यांनी सांगितले.  

वाझेसोबत 'वसुली वसुली' खेळ खेळण्यातच सरकारचा वेळ गेला.. 
महाराष्ट्रात तीन वसुली पक्षांच्या निष्काळजीमुळे अनेकांचे जीव हॅास्पीटलच्या दारात तडफडून जात आहे. मेल्यानंतर तरी शवाचा सन्मान करा. सचिन वाझेसारख्या  लोकांना पकडून त्याच्यासोबत 'वसुली वसुली' हा खेळ सरकाला खेळायचा होता. यातच त्यांचा वेळ गेला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची वाईट परिस्थिती झाली. हे तीनही पक्ष या वाईट परिस्थितीला जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे नेते राम कदम यांनी केला आहे.  शवाचा सन्मान करण्याची पद्धत देशात आहे. पण बीडमध्ये हा प्रकार पाहून वाटतेय की या महाराष्ट्राच्या भूमीत चाललयं काय, असा सवाल कदम यांनी उपस्थित केला आहे. 
Edited by : Mangesh Mahale
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख