बाळासाहेबांची हिंदुत्वाची मशाल उद्धव ठाकरे सत्तेवर असताना विझली..दरेकरांचा शिवसेनेला टोला... - bjp leader pravin darekar slam uddhav-thackeray palghar mob lynching case | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

बाळासाहेबांची हिंदुत्वाची मशाल उद्धव ठाकरे सत्तेवर असताना विझली..दरेकरांचा शिवसेनेला टोला...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

उद्धव ठाकरेंनी या हत्याकांडावरील आपलं मौन सोडावं.

मुंबई :  पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्या प्रकरणाला आज (ता. 16) एक वर्ष पूर्ण होत आहे.  गडचिंचले येथे घडलेला प्रकार देशाला हादरवून सोडणारा होता.  या प्रकरणावरून आजही सरकारवर विरोधक टीका करीत असतात. 

विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज टि्वट करीत या प्रकरणाची चैाकशी त्रयस्त एजन्सीमार्फत करण्याची मागणी केली आहे. भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य भोसले यांच्यासोबत आज दरेकर यांनी मंत्रालयाजवळ राज्य सरकारच्या विरोधात लाक्षणिक उपोषण केले. ''पालघर साधू हत्याकांडाची त्रयस्त एजन्सीमार्फत चौकशी झाली, तरचं साधूंना न्याय मिळू शकेल.,''असे टि्वट प्रविण दरेकर यांनी केली आहे. 
 
''पालघर साधू हत्याकांडाला 1 वर्ष पूर्ण झालं, तरी अजून न्याय मिळाला नाही. हिंदुत्वाचे तेजस्वी रूप हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंनी झळाळते ठेवले होते, त्यांनी हिंदुत्वासाठी 'मशाल' पेटवली. त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरेजी सत्तेवर असताना मात्र ही मशाल विझली असून त्याचा धूर होताना दिसतो आहे. पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या विचारांची कास धरत उद्धव ठाकरेंनी या हत्याकांडावरील आपलं मौन सोडावं व सरकारचे प्रमुख म्हणून भूमिका स्पष्ट करावी आणि न्याय द्यावा,'' असे दरेकर यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. 

पालघर साधू हत्या प्रकरण...

देशभरात गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  कडक लॉकडाउन करण्यात आले होते. त्यामुळे एका जिल्ह्यातून किंवा राज्यातून अति तातडीचा प्रवास मिळेल त्या मार्गाने रात्री-अपरात्री प्रवास नागरिक करत होते.  अशाच एका प्रकरणातून गडचिंचले साधू हत्याकांड सारखी दुर्घटना घडली.  ता. 16 एप्रिल 2020 रोजी, 70 वर्षीय चिकणे महाराज कल्पवृक्षगिरी आणि 35 वर्षीय सुशीलगिरी महाराज आपल्या 30 वर्षीय वाहन चालक निलेश तेलगडे सुरत याठिकाणी चालले होते. लॉकडाउनचे निर्बंध होते. अशात गुरू श्री महंत रामगिरी यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी संबंधित साधु पालघर मार्गे जात होते. यावेळी रात्री दहाच्या सुमारास गडचिंचोले गावातून जात असताना स्थानिक लोकांनी त्यांची गाडी अडवली. त्यांना चोर समजून  बेदम मारहाण केली. यात दोन साधुंसह चालकाचा मृत्यू झाला होता.
Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख