अनिल देशमुख कुठे आहेत, हे राष्ट्रवादीनं सांगावे !

आपल्या खात्यातील माणूस कुठे आहे हे महित नसणे यावरून पोलिस खात्यात काय गोंधळ सुरू आहे हे स्पष्ट होतं.
2Sarkarnama_20Banner_20_202021_05_11T145027.019.jpg
2Sarkarnama_20Banner_20_202021_05_11T145027.019.jpg

मुंबई : गेल्या आठवड्यातच मनी लाँड्रिंग प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्याविरोधात ईडीने लूकआऊट नोटीस जारी (ED Lookout Notice) केली. 100 कोटी रुपयांचे वसुली आदेश प्रकरणात ईडीने (ED) ही लूकआऊट नोटीस जारी केली आहे. देशमुखांना आतापर्यंत ५ वेळा समन्स बजावूनही ते ईडीसमोर हजर न झाल्याने त्यांना अखेर लूकआऊट नोटीस जारी  करण्यात आली आहे.

भाजपचे नेते प्रविण दरेकर म्हणाले की, अनिल देशमुख हे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. पोलिस आयुक्त कुठे बेपत्ता आहेत कळत नाही. ते मुंबई आहेत का कुठे हे कळत नाही. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व पोलिस आयुक्तांनी अनिल देशमुख कुठे आहेत हे सांगायला हवे. आपल्या खात्यातील माणूस कुठे आहे हे महित नसणे यावरून पोलिस खात्यात काय गोंधळ सुरू आहे हे स्पष्ट होतं. ''अनिल देशमुख कुठे आहेत हे राष्ट्रवादी कॉग्रेसने सांगावे,'' असे प्रविण दरेकर यांनी सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते.

अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या कथित 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात तपास यंत्रणांनी त्यांच्या भोवतीचा फास आणखी आवळत चालवला आहे. त्यांच्या विरोधात आता ईडीने (ED) लुकआउट नोटीस जारी केली आहे. आता त्यांना देश सोडून जाता येणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वाझे आणि अन्य दोन पोलिसांना देशमुख यांनी मुंबईतील हॉटेल व्यावसायिक व बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितले होते, असा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरु केला. 

देशमुख यांना चौकशीसाठी पाच वेळा समन्स बजावले आहे. मात्र, देशमुख गैरहजर राहिल्यानंतर आता सहावे समन्सदेखील बजावण्याची तयारी ईडीने केली आहे. पण त्याआधी त्यांनी देश सोडून जाऊ नये यासाठी ही नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, या आधी परमबीरसिंह यांच्या विरोधातही ठाणे पोलिसांनी लुकआऊट नोटीस बजावली आहे. देशमुख यांच्या नोटीशी संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी नोटीस बजावली नसल्याचे म्हटले आहे.   

देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याचा सीबीआयचा कथित अहवाल मागील आठवड्यात सोशल मीडियात व्हायरल झाला होता. याप्रकरणी सीबीआयने cbi सीबीआयचे उपनिरिक्षकाला अटक केली आहे. हा अहवाल बाहेर आल्यानंतर सीबीआयने केलेल्या प्राथमिक तपासात देशमुख यांच्या लिगल टीमने तिवारी यांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याचे आढळले होते.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com