नानाजी मांजरासारखे वागताय डोळे मिटून सगळे नियम मोडताय! 

भाजपवर आक्रमकपणे टीका करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आता भाजप नेत्यांनीही तितक्याच आक्रमकपणे तुटून पडण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे.
 Prasad Lad, Nana Patole .jpg
Prasad Lad, Nana Patole .jpg

मुंबई : भाजपवर आक्रमकपणे टीका करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर आता भाजप नेत्यांनीही तितक्याच आक्रमकपणे तुटून पडण्यास सुरुवात केल्याचे चित्र आहे. विलगीकरणात असलेले पटोले सार्वजनिक कार्यक्रमात हजर राहिल्याने, नाना च्या नाना तऱ्हा, सकाळी आयसोलेशन अन रात्री सेलिब्रेशन, असा टोला भाजप नेते आमदार प्रसाद लाड यांनी लगावला आहे. 

नाना पटोले यांच्या मुंबईतील घरातील दोघांना कोरोना झाल्यामुळे सावधगिरीचा उपाय म्हणून पटोले हे विलगीकरणात गेल्याचे सांगितले जात होते. मात्र तरीही शुक्रवारी (ता. 19) रात्री जुहू येथे शिवजयंती निमित्त आयोजित कार्यक्रमास पटोले उपस्थित राहिले. पटोले यांच्या या कृतीवर प्रसाद लाड यांनी टीका केली आहे. 

पटोले यांनीच शिवजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अन्य व्यक्तींसह स्वतः उपस्थित राहिल्याची किमान तीन छायाचित्रे ट्वीट केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुहू, मुंबई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले, असे पटोले यांनी त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यावेळी त्यांनी अन्य नेते-कार्यकर्ते यांच्यात मिसळून हारतुरे-सत्कार या बाबीही केल्याचे छायाचित्रात दिसते आहे. विलगीकरणात असताना सार्वजनिक ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल लाड यांनी पटोले यांचा समाचार घेतला. 

पटोले यांचे जाहीर कार्यक्रमातील ते छायाचित्रही आपल्या ट्वीटमध्ये टाकून लाड यांनी त्यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. नाना च्या नाना तऱ्हा. सकाळी आयसोलेशन अन रात्री सेलिब्रेशन, हाच आहे काँग्रेसचे तमाशा. स्वतःचे कार्यक्रम जोशात साजरे करायचे आणि असेच छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणाऱ्यांना 144 कलम लाऊन अटक करायची. नानाजी मांजरासारखे वागताय, डोळे मिटून सगळे नियम मोडताय, असेही लाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यावर राज्यपालांसह अन्य भाजप नेत्यांवर जोरदार टीका करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आता भाजप ने देखील त्यांना लक्ष करून त्यांना त्याचप्रकारे प्रत्युत्तर देण्याचे डावपेच आखल्याची चर्चा यानिमित्ताने होत आहे.

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com