मुंबई : सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी थेट परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर त्यांनी मुंबई पालिकेतील ठेकेदारांकडून पैसे गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप केला. तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा जबाब त्यांनी पत्र लिहून न्यायदंडाधिकाऱ्यांना दिला आहे. मुंबई महापालिकेतील वादग्रस्त 50 कंत्राटदारांकडून प्रत्येक दोन कोटी रुपये गोळा करण्याचे काम परब यांनी सांगिल्याचा दावा वाझे यांनी केला आहे.
कुत्र भीक घालत नाही तुझ्या शिवसैनिकांच्या शपथांवर. उद्या जत्रेत जाऊन पाकीट माराल आणि सांगाल बाळासाहेबांची शपथ घेतो पाकीट मी नाही मारलं तर पोलिसांनी सोडून द्यायचं का?? हीच शपथ कोर्टात घेतली तर जज हाथ पाय बांधून ६ महिन्याची पोलीस कस्टडी देतील. संज्या स्वतः बाईच्या लफड्यात अडकलाय. https://t.co/KdAJGsUA6V
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 8, 2021
यावर अनिल परब यांनी हे आपल्या दोन मुलीची व शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन हे आरोप फेटाळले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अनिल परब यांची पाठराखण केली होती. यावर भाजपचे नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत राणे यांनी टि्वट करीत राऊतांवर टीका केली आहे.
आपल्या टि्वटमध्ये राणे म्हणतात की, कुत्र भीक घालत नाही तुझ्या शिवसैनिकांच्या शपथांवर. उद्या जत्रेत जाऊन पाकीट माराल आणि सांगाल बाळासाहेबांची शपथ घेतो पाकीट मी नाही मारलं तर पोलिसांनी सोडून द्यायचं का?? हीच शपथ कोर्टात घेतली तर जज हाथ पाय बांधून ६ महिन्याची पोलीस कस्टडी देतील.
अनिल परब यांनी हे आरोप फेटाळले आहेत सरकारची बदनामी करण्यासाठी हे पत्र दिले आहे. सचिन वाझे कस्टडीत आहे.त्याने अजून कोणाकडे तक्रार केली नाही. अशी पत्रे बाहेर काढून सरकारला बदनाम करण्याचे काम सुरू आहे. वाझे काही काळ शिवसेनेत होते. प्रदीप शर्मा पण शिवसेनेचे उमेदवार होते मान्य करतो. पण वाझेंना शिवसेनेने अस काम करायला सांगितलं नाही. केंद्रीय यंत्रणाच वापर कसून शिवसेनेच्या मागे ससेमिरा लावला आहे. बदनामीचा हा लेटर बॉम्ब काढून आम्हाला काही होणार नाही. मला चौकशीला बोलवा मी दोषी असेल तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील.मी पूर्णपणे कायदेशीर लढणार मी लढाईच्या तयारीत आहे. अश्या धमक्यांना घाबरत नाही.मला टार्गेट करून मुख्यमंत्र्याना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे, असे प्रत्युत्तर परब यांनी दिले.

