ठाकरे सरकारचा 'मुंबई पॅटर्न' खोटारडा...मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्यात..नितेश राणेंचा गंभीर आरोप..

नितेश राणे यांनी टि्वट करुन ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
3Nitesh_20Rane_20_20Uddhav_20Thakre_1.jpg
3Nitesh_20Rane_20_20Uddhav_20Thakre_1.jpg

मुंबई : मुंबईत कोरोना रग्णसंख्येवरुन भाजपचे नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुंबईची कोरोना रुग्णांची संख्या कमी दाखविण्यासाठी रुग्णांना पुण्यात उपचारासाठी पाठविण्यात येत असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. याबाबत नितेश राणे यांनी टि्वट करुन ठाकरेंवर निशाणा साधला आहे. 

मुंबई पॅटर्न (Mumbai Pattern) हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे.  BJP leader Nitesh Rane slams cm Uddhav Thackeray fake Mumbai Model मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच ‘मुंबई पॅटर्न’आहे का? अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली आहे. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत असल्याचे नितेश यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलं आहे.

ठाकरे सरकार मुंबईतील रुग्णांची नोंद पुण्याच्या आकडेवाडीत  करून येथील रुग्णांचा आकडा कमी भासवत असल्याचे नितेश राणे यांनी टि्वटमध्ये  म्हटलं आहे.   नितेश राणे म्हणतात की, मुंबईतून रुग्ण पुण्याला पाठविले जात नाही, फक्त त्यांची नोंद ही मुंबईत न करात अन्य शहराच्या आकडेवाडीत केली जाते. त्यामुळे राज्यातील अन्य शहराच्या तुलनेत मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा हा कमी राहतो. 

पुणे जिल्ह्यात ४६४३ नवे रुग्ण 

पुणे जिल्ह्यातील काल दिवसभरातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या सोमवारी (ता. १०) पाच हजारांच्या आत आली आहे. याउलट नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या दुप्पटीच्या आसपास गेली आहे. जिल्ह्यात काल ९ हजार ७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय रुग्णांच्या मृत्यूची संख्यासुद्धा कमी झाली आहे. एकूण नवीन रुग्णांत पुणे शहरातील १ हजार १६५ रुग्ण असून शहरातील ४ हजार १० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल दिवसभरात शहराशिवाय पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार १३४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ९४०, नगरपालिका हद्दीत ३७० आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ३४ नवे रुग्ण आढळून आले आहेत.  कोरोनामुक्तांमध्ये शहरातील सर्वाधिक रुग्णाबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १ हजार ९६५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ५४३, नगरपालिका हद्दीतील ४७१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील ८५ रुग्ण आहेत. अन्य १३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील ५१ मृत्यू आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com