'माणसं मरताहेत..याला ठाकरे सरकारच जबाबदार...' नारायण राणेंचा हल्लाबोल... - BJP leader Narayan Rane targets Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

'माणसं मरताहेत..याला ठाकरे सरकारच जबाबदार...' नारायण राणेंचा हल्लाबोल...

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

'मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काय करताहेत,' असा सवाल नारायण राणे यांनी  उपस्थित केला. 

मुंबई : ''कोरोनाला रोखण्यासाठी ठाकरे सरकार अपयशी ठरले आहे. दिवाळीखोरीतील हे सरकार जनतेला वाचवू शकत नाही. जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज बाळगा,'' असा हल्लाबोल भाजपचे नेते नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.  पत्रकार परिषदेत राणे आज बोलत होते.

नारायण राणे यांनी कोरोना, लॅाकडाउन, सरकारच्या गरीबांसाठीच्या योजना, संचारबंदी यावर कठोर टीका केली. ''कोरोनामुळे माणसं मरताहेत..याला ठाकरे सरकार जबाबदार आहेत,'' असा आरोप राणे यांनी सरकारवर केला आहे. 'मातोश्रीच्या पिंजऱ्यात बसून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे काय करताहेत,' असा सवाल राणे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. 

राणे म्हणाले की, लॅाकडाउनमुळे अनेकांचे व्यवसाय, उद्योग, बंद पडले आहेत. महाराष्ट्र सरकार कोरोना हातळण्यास कमी पडलं आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढत आहे.

राज्यात जवळपास ६० हजार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला. ४१ टक्के मृत्यू हे फक्त महाराष्ट्रात आहे. राज्यात मुख्यमंत्र्यांनी अघोषित संचारबंदी सुरू केली आहे.  दीड हजार च्या पॅकेज मध्ये रिक्षा चालक कसे उपजिविका चालवतील.

राणे म्हणाले, ''मृतांची संख्या वाढणे हे राज्य सरकारच अपयश आहे. मुंबईतून केंद्राला ३१ टक्के महसूल मिळतो. लॅाकडाउनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय संपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे कामगार उद्वस्त होणार आहे. मुंबईत भिकाऱ्याची संख्या ही सव्वा लाख आहे. त्याच्या उपजिविकेच काय करणार ? एका बाजूला लॅाकडाउन करायचे आणि दुसरीकडे जीएसटी सुरु आहे. जनतेने हा कर कसा  भरायचा.''

''आता सरकार पेट्रोलपंपही बंद करणार आहे, मग रुग्णांना रुग्णालयात कसे नेणार..त्यासाठी ''मातोश्री''तून सचिन वाझेची गाडी आणणार का,'' असा सवाल राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला. 

Edited by: Mangesh Mahale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख