अनिल परब यांना NIA उचलून नेईल! नारायण राणेंचं भाकित  - Bjp Leader Narayan Rane criticise Anil parad over sachin waze letter | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

अनिल परब यांना NIA उचलून नेईल! नारायण राणेंचं भाकित 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 16 एप्रिल 2021

सचिन वाझे याने एका पत्राद्वारे परब यांच्यावरही वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआयने नुकतीच आठ तास चौकशी केली आहे. तर सचिन वाझे याने एका पत्राद्वारे शिवसेना नेते अनिल परब यांच्यावरही वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी परब यांच्याविषयी मोठं भाकित केलं आहे.

सचिन वाझे हा सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. त्याने लिहिलेले एक पत्र नुकतेच समोर आले आहे. या पत्रामध्ये त्याने अनिल देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्यावरही वसुलीचे गंभीर आरोप केले आहेत. याविषयी बोलताना नारायण राणे यांनी परब यांच्या निशाणा साधला. ते म्हणाले, अनिल देशमुख यांनी जवाब दिला आहे. त्यात त्यांनी परब यांचे नाव घेतले आहे, असा दावा राणे यांनी केला आहे. 

अनिल परब यांना NIA तपासासाठी घेऊन जाईल. एनआयएकडून फक्त राज्यपालांची परवानगी घेतली जाईल. अनिल परब चौकशी ला तयार नसतील तर ते त्यांना उचलून नेतील, असे वक्तव्यही राणे यांनी केले आहे. त्यामुळे देशमुख यांच्यापाठोपाठ परब यांचीही चौकशी होणार का?, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

दरम्यान, सीबीआयने देशमुखांना अनेक उलटसुलट प्रश्न विचारल्याचे सांगितले जात आहे. मात्र, देशमुख यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असल्याचे समजते. देशमुख यांची चौकशी ६ वाजताच संपली होती. त्यानंतरही काही वेळ ते सीबीआयच्या कार्यालयातच होते. या प्रकरणात या पूर्वी पाच जणांची चौकशी झालेली आहे. त्यात देशमुख यांचे दोन स्वीय सहाय्यक, सचिन वाझे, दोन पोलिस अधिकारी, स्वत: आरोप करणारे परमबिर सिंह यांची ही चौकशी झालेली आहे.

सीबीआयने समन्स बजावल्यानंतर देशमुख सकाळी सीबीआयच्या कार्यालयात पोहोचले होते. यावेळी सीबीआयचे एसपी दर्जाचे अधिकारी अभिषेक दुलार आणि किरण एस यांच्याकडून देशमुखांची चौकशी करण्यात आली. सांताक्रुझच्या कालिना येथील डीआरडीओच्या कार्यालयात ही चौकशी करण्यात आली. चौकशीसाठी सीबीआयने प्रश्नांची यादी तयार केली होती अशी माहिती मिळत आहे. १५ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत होते. 

Edited By Rajanand More

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख