ठाकरे सरकारचा गैरव्यवहार जनतेसमोर येणार...अनिल परब यांच्यावरही कारवाई होणार..  - BJP leader Kirit Saimaiya accuses Chief Minister Uddhav Thackeray | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

ठाकरे सरकारचा गैरव्यवहार जनतेसमोर येणार...अनिल परब यांच्यावरही कारवाई होणार.. 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 24 एप्रिल 2021

काही दिवसात परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही कारवाई होणार, असे किरिट सैामय्या म्हणाले.

मुंबई : ''निंलबित पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि गँग यांच्यावर कारवाई होत आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय) ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कारवाई केली आहे. आता काही दिवसात परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही कारवाई होणार आहे. आणखी दोन मोठे नेते दोन हजार कोटींच्या वाटपात, हिशोबात सामील आहेत,'' असा आरोप भाजपचे नेते किरिट सैामय्या यांनी केला आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा छापा टाकला आहे. या पार्श्वभूमीवर देशमुख बोलत होते.  ''मला विश्वास आहे की  एनआयए, ईडी यांनी चौकशी केली आता सीबीआय करत आहे. पुढे आयकर विभाग त्यांची चैाकशी करेल. ठाकरे सरकारच्या गैरव्यवहाराचा हिशोब जनतेसमोर येणार,'' असे किरीट सैामय्या म्हणाले. 

  
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा छापा 

माजी गृहमंत्री  अनिल देशमुख यांचे घर आणि कार्यालयावर सीबीआयने छापा टाकला आहे. देशमुख यांचे मुंबई , नागपूर येथील दहा ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहे. शंभर कोटी गैरव्यवगारप्रकरणी अनिल देशमुख यांनी नुकतीच चैाकशी झाली होती. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. 

निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने देशमुखांवर आरोप केला होता. दर महिन्याला शंभर कोटीची वसूलीचे आदेश देशमुखांनी आपल्याला दिला होता, असा आरोप वाझे याने केला होता.  राज्य सरकारने बदली केल्यानंतर अस्वस्थ झालेल्या परमबीरसिंग (Parambir Singh) यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र लिहिले होते. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखांनी (Anil Deshmukh) सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला १००  कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिले होते. 

अनिल देशमुखांनी वाझे यांना हॉटेल, बार आणि इतर अस्थापनांकडून एकूण शंभर कोटी रुपये वसूल करण्यास सांगितले होते. मागील काही महिन्यांत वाझेंना गृहमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी अनेक वेळा बोलावले होते. या भेटींमध्ये ते वाझेंना (Sachin Waze) निधी गोळा करण्यासाठी सांगत, असे आरोप परमबीर सिंग यांनी या पत्रात केले होते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख