गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी म्हणूनच ते असं वक्तव्यं करताहेत..फडणवीसांचा टोला (Video) - bjp leader Devendra Fadnavis criticize Shivsena MLA Sanjay Gaikwad | Politics Marathi News - Sarkarnama

गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी म्हणूनच ते असं वक्तव्यं करताहेत..फडणवीसांचा टोला (Video)

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 एप्रिल 2021

गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी म्हणूनच ते असं वक्तव्यं करत आहेत,' असा टोला फडणवीसांनी लगावला.

मुंबई : ''मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असे वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी काल केलं होतं. यावर फडणवीसांनी  प्रत्युत्तर दिले आहे.  'आमदार गायकवाडांची रात्रीची उतरली नसावी म्हणूनच ते असं वक्तव्यं करत आहेत,' असा टोला फडणवीसांनी लगावला. ते प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. 

देवेंद्र फडणवीस म्हणाले, ''गायकवाड यांना माझी एकच विनंती आहे त्यांनी कोरोनाचे विषाणू माझ्या घशात घालण्यापूर्वी स्वतः हॅंड ग्लोव्हज आणि मास्क घालावे, कारण मला जनतेचे आर्शीवाद आहे, त्यामुळे कोरोनाच्या विषाणूने मला काहीही होणार नाही, कोरोनाचे विषाणू हे सामान्य व्यक्तीपेक्षा ते तळीरामांना कोरोना लवकर होतो, असे म्हणतात, त्यामुळे त्यांची इच्छा असेल तर त्यांनी हँड ग्लोव्हज आणि मास्क वापरावा.'' 

''जर का माणसेच जिवंत राहिली नाही तर तुम्हाला मतदान कोण करणार असा प्रश्न तुम्ही सरकारला विचारत आहात. त्याशिवाय तुम्ही तर सरकार पाडायला निघाले आहात. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा, असे आवाहनही त्यांनी भाजपला केलं आहे. तसेच कोरोनाचें जंतू जर मला मिळाले असते तर देवेंद्रच्या तोंडात कोंबले असते,'' असे वक्तव्य काल गायकवाड यांनी केलं होतं. 

हेही वाचा : रेमडेसिवीरअभावी चिता पेटल्या .. त्यावर भाजपनं राजकीय तवे शेकवू नयेत.. 

मुंबई :  मुंबईसह महाराष्ट्र तुमच्या म्हणजे केंद्राच्या तिजोरीत सर्वाधिक पैसा ‘खणाखणा’ ओतत आहे. हा पुरवठा थांबला तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांडय़ा लावाव्या लागतील. महाराष्ट्राने देशातील लोकांच्या पोटापाण्याची व्यवस्था सदैव केली. आजही करत आहे, पण आज महाराष्ट्र संकटात असताना केंद्रातले मंत्री दिल्या-घेतल्याच्या हिशेबाच्या चोपडय़ा फडकवून महाराष्ट्राला त्रास देत आहेत, असा आरोप शिवसेनेने केला आहे.'प्राणवायू' चे राजकारण झालेय तसे रेमडेसिवीरचेही सुरू आहे. महाराष्ट्र सरकारला हे इंजेक्शन हवे, ते त्यांना मिळत नाही, पण महाराष्ट्रातील भाजपचे उपरे पुढारी त्या औषध कंपन्यांकडून परस्पर रेमडेसिवीरचा साठा विकत घेतात, त्या कंपन्या हा साठा त्यांना परस्पर उपलब्ध करून देतात हा अपराधच आहे, पण ही साठेबाजी व काळाबाजारी कृत्ये पोलिसांनी उघड करताच भाजपचे लोक कढईतल्या गरम वडय़ासारखे उकळून फुटू लागले. .
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख