मग आपली पोलिस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीये का?

जान मोहम्मद हा वीस वर्षांपूर्वी डी कंपनीशी संबंधित आहे.
 Chitra Wagh .jpg
Chitra Wagh .jpg

मुंबई : दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सहा दहशतवाद्यांना (Terrorist) अटक केली आहे. त्यापैकी जान मोहम्मद शेख मुंबईतील धारावी झोपडपट्टीत राहणारा आहे. तो दाऊद इब्राहीमच्या (D Company) गँगशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. जान मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी आता राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (BJP leader Chitra Wagh criticizes the state government) 

त्यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. त्या ट्वीटमध्ये म्हटल्या की, दिल्ली पोलिस येऊन मुंबईतील आतंकवादी पकडताहेत. मग आपली पोलिस फौज सरकारने १०० कोटी मोजायला बसवलीये का? महिलांची सुरक्षीतता धोक्यात आहे. आता मुंबई आणि महाराष्ट्राचीही सुरक्षा धोक्यात आहे, अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख विनीत अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, जान मोहम्मद हा वीस वर्षांपूर्वी डी कंपनीशी संबंधित आहे. आमचे त्याच्यावर लक्ष होते. मात्र, या प्रकरणाची आम्हाला काहीही माहिती नव्हती. वीस वर्षांपूर्वी त्याच्यावर पायधुनी पोलिस ठाण्यात फायरिंगचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्यावर वीज चोरीचाही गुन्हा दाखल आहे. त्याची आर्थिक स्थिती हलाखीची आहे. त्याच्याकडे दिल्ली पोलिसांनी विस्फोटके सापडली नाहीत, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले आहे.  

मुंबईतील अंडरवर्ल्ड नियंत्रणात आहे. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी आम्हाला पूर्ण मोकळीक दिली आहे. मुंबईतून जान मोहम्मदला पकडण्यात आले असले तरी यात एटीएसचे अपयश नाही. थेट दिल्ली पोलिसांनी याबाबत यंत्रणांकडून माहिती देण्यात आली होती. एटीएस ही माहिती नव्हती. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

दहशतवाद्यांकडे विस्फोटके सापडली असली तरी महाराष्ट्रात काहीही सापडले नाही. जान मोहम्मदकडे पोलिसांनी विस्फोटक मिळाली नाहीत. मुंबईत रेकीही केलेली नाही. ते करणार होते. त्यामुळे यात एटीएसचे अपयश म्हणता येणार नाही, असेही अगरवाल यांनी स्पष्ट केले आहे. जान मोहम्मदकडे अधिक चौकशी करण्यासाठी एटीएसची टीम दिल्लीला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.        

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com