कॉंग्रेस महामारीवर अतिशय प्रभावी मोदी लस आलीय बरं का...

भाई जगताप यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला अवधुत वाघ यांनी उत्तर दिले आहे.
Sarkarnama Banner - 2021-04-30T151033.477.jpg
Sarkarnama Banner - 2021-04-30T151033.477.jpg

मुंबई :  "आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…"असे वादग्रस्त  ट्विट भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ  Avdhut Wagh यांनी केले होते. त्यावर राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. आता अवधुत वाघ यांनी मुंबई कॅाग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यावर निशाणा साधला आहे. 

देशभरात कोरानानं थैमान घातलं असून कोरोना लस मोफत द्यायची की नाही, यावरून सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दीक युद्ध सुरु आहे. लशींवरुन भाई जगताप यांनी टि्वट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्याला अवधुत वाघ यांनी उत्तर दिले आहे. 

"घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ रोगप्रतिबंधक लसी आपल्या देशात मोफत मिळाल्या...हे सर्व ७० वर्षांत झालं, बरं का," असे टि्वट करुन भाई जगताप यांनी काल भाजपच्या नेत्यांना डिवचले होते. 

जगताप यांच्या टि्वटला वाघ यांनी टि्वट करत प्रतिहल्ला केला आहे. जगताप यांचे टि्वट रिटि्वट करुन वाघ यांनी जगतापांना टोला लगावला आहे. "पण गेल्या साडेसहा वर्षात कॉंग्रेस महामारी वर अतिशय प्रभावी मोदीलस आलीय बरं का," असे टि्वट करुन वाघ यांनी केलं आहे. 

देशभरामध्ये करोनाबाधितांची संख्या झापाट्याने वाढत आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये मागील काही दिवसांपासून दिवसाला साडेतीन लाखांहून अधिक रुग्ण देशात आढळून येत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये ऑक्सिजन बेड्स, औषधे आणि इतर आरोग्य व्यवस्थांचा तुटवडा जाणवत आहे. 

हेही वाचा :  पंतप्रधानांना कटोरा घेऊन पुनः पुन्हा अमेरिका, चीनच्या दारात जावे लागत आहे.. 

मुंबई : जेमतेम तीन आठवडे पुरेल एवढाच गहू पाकिस्तानच्या निवडक गोदामांमध्ये शिल्लक आहे. तीन आठवडय़ांनंतर खायचे काय, असा गंभीर प्रश्न पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारपुढे निर्माण झाला आहे. पाकिस्तानमध्ये गव्हाच्या साठ्याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून टीका करण्यात आली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आला आहे. "खायला नाही दाणा अन् मला बाजीराव म्हणा" ही म्हण पाकिस्तानाला लागू पडते, असा टोला सामनातून इम्रान खान यांना मारला आहे. "आधीच पाकिस्तानची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. पंतप्रधान इम्रान खान यांना हातात कटोरा घेऊन पुनः पुन्हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीपासून अमेरिका व चीनच्या दारात जावे लागत आहे. त्यात गव्हाच्या टंचाईचे अभूतपूर्व संकट पाकिस्तानसमोर उभे ठाकले आहे. इम्रान खान यातून मार्ग काढतीलही, पण खिशात आणा नसताना बाजीराव बनण्याचे सोंग पाकिस्तानने का करावे," असा सवाल अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे. 
Edited by : Mangesh Mahale 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com