अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी 7 कोटी? एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र ?..भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - BJP leader Atul Bhatkhalkar's allegation against the Chief Minister on the beneficiaries of the food security scheme | Politics Marathi News - Sarkarnama

अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी 7 कोटी? एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र ?..भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 एप्रिल 2021

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा समाचार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला.

मुंबई  : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात पंधरा दिवसांचे लॅाकडाउन जाहीर केलं आहे. "लॅाकडाउनमुऴे गरीब जनतेचा विचार करून सरकारने अन्न सुरक्षा योजनेच्या अंतर्गत 7 कोटी जनतेला लाभ मिऴणार," असे काल मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या या व्यक्तव्याची भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी खिल्ली उडवली आहे. भातखळकर यांनी याबाबत टि्वट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
 

"महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी.त्यातील अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी 7 कोटी? एवढा दरिद्री आहे का महाराष्ट्र माझा? मुख्यमंत्री महोदय बोलताना थोडा विचार आणि बोलण्यापूर्वी थोडा अभ्यास केलात तर बरं
होईल," असे टि्वट भातखळकर यांनी केलं आहे. 

राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी  आजपासून 15 दिवसांसाठी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी जाहीर केली आहे.  सध्या रात्रीची असलेली संचारबंदी दिवसादेखील लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी काल जनतेला दिलेल्या संदेशात जाहीर केला. अनावश्यक सर्व कामे, उद्योग बंद राहणार असल्याचे त्यांनी घोषित केले.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनांचा समाचार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. फडणवीस म्हणाले की, सरकारने समाजाच्या कुठल्याही घटकाला कुठलीही मदत केली नाही.  केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, त्याच योजना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारचे पॅकेज म्हणून जाहीर केल्या आहेत. वस्तूस्थिती समजून न घेता सरकारने धूळफेक केली आहे. 

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये अनेक लहान घटक लाभापासून वंचित राहतील. फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकारने पॅकेज जाहीर केलं, त्यांचा फायदा फेरीवाल्यांना होणार नाही, असा दावा फडणवीस यांनी केला
आहे. सरकारच्या जुन्या योजनांचा पॅकज म्हणून जाहीर केल्या आहेत. पॅकेज ही केवळ  धूळफेक आहे, असे फडणवीस म्हणाले. 

नागपूर येथे कोरोनाच्या उपाययोजना करण्यास सरकार अपयशी ठरले आहे, नागपुरची परिस्थिती अंत्यत वाईट आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. आँक्सिजनचे नियोजन करण्यात राज्य सरकार कमी पडत आहे, असा
आरोप फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर केला आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख