Sarkarnama Banner - 2021-05-11T134703.944.jpg
Sarkarnama Banner - 2021-05-11T134703.944.jpg

ठाकरेंचे पर्यावरण प्रेम बोगस व बेगडी..भातखळकरांचा टोला..आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान 

स्वतः सह बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठीच ठाकरे सरकारचे हे उद्योग सुरू आहेत.

मुंबई : मेट्रो कारशेडवरुन भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "आरे मध्ये झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प घोषित केल्यामुळे युवराज आदित्य ठाकरे Aditya Thackeray यांचे पर्यावरण प्रेम पूर्णतः बोगस व बेगडी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, " अशी टीका अतुल भातखळकर Atul Bhatkhalkarयांनी केली आहे. याबाबत भातखळकरांनी व्हिडिओ टि्वट केला आहे.  BJP leader Atul Bhatkhalkar criticizes Environment Minister Aditya Thackeray

मुंबईकरांना फायद्याचा असणारा मेट्रो कारशेड प्रकल्प खोटी कारणे देत आरे येथून इतरत्र हलवून मुंबईकरांचे नुकसान केले, पण आता स्वतः सह बिल्डरांचे उखळ पांढरे करण्यासाठीच ठाकरे सरकारचे हे उद्योग सुरू आहेत. याविरोधात भारतीय जनता पार्टी मोठे जनआंदोलन उभारेल व गरज पडल्यास उच्च न्यायालयात सुद्धा जाणार असल्याचा इशारा सुद्धा भातखळकरांनी दिला आहे.

"आरे कॉलनीत SRA योजना लागू करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे  मेट्रोकारशेडला विरोध बोगस होता हे स्पष्ट झाले आहे. आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही उघड झाला आहे. मुंबईकरांचे भले करणारी मेट्रो कारशेड नको, मात्र बिल्डरांचे उखळ पांढरे करून टक्केवारची सोय करणारी SRA योजना मात्र हवी," असे भातखळकर यांनी म्हटलं आहे. 
 
आपले तथाकथित पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे मध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करून आरेची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचे कारस्थान चालविले आहे, हे अत्यंत संतापजनक असून युवराज आदित्य ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णतः  बोगस व बेगडी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले असल्याची टीका भाजपा मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्व चे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

आरे मध्ये कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास उच्च न्यायालयाची मनाई असताना सुद्धा ठाकरे सरकारने  आरे मधील तब्बल 32310 वर्ग फुटाच्या जागेवर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला. इतकेच नव्हे तर हा परिसर परि-संवेदनशील क्षेत्र असताना सुद्धा केवळ बिल्डरांच्या सोबत असलेल्या 'आर्थिक' संवादातून हा प्रकल्प करण्याचे ठाकरे सरकारने ठरविले आहे, अशी टीका भातखळकरांनी केली आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com