फडणवीस सरकारचा कायदा, गायकवाड अहवाल पाण्यात घालण्याचे काम राज्य सरकारने केले!  - BJP leader Ashish Shelar criticizes state government over Maratha reservation | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

फडणवीस सरकारचा कायदा, गायकवाड अहवाल पाण्यात घालण्याचे काम राज्य सरकारने केले! 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 5 मे 2021

मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागास गटात घेऊन जे आरक्षण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने मिळवून दिले होते. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात राज्य सरकारला अपयश आलेले आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निकाल दिला. राज्य सरकारचा मराठा आरक्षणाचा कायदा न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकार व मराठा समाजाला मोठा धक्का बसला आहे. त्यावरुन भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राज्य सरकारव टीका केली आहे. BJP leader Ashish Shelar criticizes state government over Maratha reservation 

शेलार मुंबईमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिक मागास गटात घेऊन जे आरक्षण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारने मिळवून दिले होते. ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकवण्यात राज्य सरकारला अपयश आलेले आहे. इंदिरा सहाणींच्या मोठ्या बेंचच्या जजमेंटने विशेष परिस्थिती 50 टक्के पेक्षा जास्त आरक्षण दिलेले होते. त्या आधारावर फडणवीस सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाची स्थापना केली होती.

सर्व महाडिकांना सत्तेच्या सर्व पदांवरुन घालवले तेव्हाच सतेज पाटील शांत झाले.....

मागासवर्ग आयोगासमोर मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आवश्यक असणारी माहिती, सर्व राज्यातील संघटनांकडून माहिती जमा करुन त्यांचा व्यवस्थीत अभ्यास करण्याच काम फडणवीस सरकारने केले होते. त्यावेळी विरोधी पक्षातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्या संस्था संघटनांना विरोध केला होता, असे शेलार म्हणाले. मागासवर्गीय आयोगाची स्थापना आपण केली. गायकवाड कमिशनच्या विरोधात भाषण देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केले आहे.

गायकवाड आयोगाच्या अहवालावर कायदा आला. मुंबई उच्च न्यायालयात ज्यावेळी त्याला विरोध करण्यात आला त्यावेळी फडणवीस सरकारने मुंबई उच्च न्यायालयात कायदा टिकवला, असेही शेलार यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) मराठा संघटना, मराठा वकील यांच्याशी संपर्क केला नाही, असा आरोप शेलार यांनी केला. देवेंद्र फडणवीस सरकारचा कायदा, गायकवाड आयोगाचा अहवाल पाण्यात घालण्याचे काम राज्य सरकारने केले आहे, अशी टीका शेलार यांनी केली.

उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांनी फोन केलेल्या डॅा. मिणचेकरांनी 'गोकुळ'चे मैदानही मारले
 

 महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाला फायदा मिळवून देण्यासाठी कायदा करायचा असेल तर विरोधी पक्ष तुमच्या सोबत काम करण्यास तयार आहे, असे शेलार यांनी सांगितले आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख