...म्हणून मोदींनी लॉकडाउन लावला होता - BJP leader Ashish Shelar criticizes state government | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

...म्हणून मोदींनी लॉकडाउन लावला होता

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 13 एप्रिल 2021

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. दररोज दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत.

मुंबई : देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत चालली आहे. दररोज दीड लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. राज्यातही रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॅाकडाऊन करण्याचा निर्णय सरकार कोणत्याही क्षणी जाहीर करु शकते. यावरुन मात्र, भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली. 

बाबरी प्रकरणी अडवानींसह ३२ जणांची मुक्तता करणारे न्यायाधीश निवृत्तीनंतर बनले लोकायुक्त 

राज्यात भाजपाकडून लॉकाडाउनला विरोध होत असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मोदींनी लागू केलेल्या लॉकडाउनचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी ट्विट करून निशाणा साधला आहे. शेलार म्हणाले की ''एक वर्षापूर्वी जेव्हा कोरोना विषाणूचा कोणताही इतिहास, भूगोल माहीत नव्हता.. आवश्यक आरोग्य यंत्रणा उपलब्ध नव्हती, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेव पर्याय म्हणून जन सहभागातून लॉकडाऊन घोषित केला. त्यावेळी महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले, असे ते म्हणाले. 

यावेळी ते म्हणाले, ''आज एक वर्षानंतर कोरोनाचे उपचार, लस, आरोग्य यंत्रणा असे बरेच काही उपलब्ध आहे. तेव्हा महाराष्ट्रातील तेच "हुषार" सत्ताधारी लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही असे सांगतात, आहेत असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे. आम्ही तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करत नाही, किंवा लॉकडाऊनला विरोध ही करीत नाही, कारण जनतेचा जीव महत्वाचा!'' असल्याचे शेलार म्हणाले.

कोरोना काळात मृतांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना सोडू नका

''मजूर तेव्हा स्थलांतरित होताना केंद्र सरकारने रस्तोरस्ती, घरोघरी मदत पोहचवली, धान्य, निवारा दिला! आज मजूरांना ना पाणी, ना धान्य ना कुठली मदत..रेल्वे स्टेशनवर केवळ लाठ्याकाठ्यांचा मार, तेव्हा मोदींना शिव्याशाप देण्यात मर्दुमकी दाखवलीत मग आज तुमचे मुसळ तर उघडे पडत नाही ना''? असा सवाल शेलार यांनी राज्य सरकारला केला आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख