पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात!  - BJP leader Ashish Shelar criticizes Jitendra Awhad | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

माजी खासदार संभाजीराव काकडे (लाला) यांचे वृद्धापकाळाने निधन.

पश्चिम बंगालच्या निवडणुकीत शरद पवारांचा अदृश्य हात! 

सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 3 मे 2021

निवडणुकीतील यशाचे मोजमाप केले तर ते भाजपकडेच आहे. डावे पक्ष रसातळाला गेले. काँग्रेसचे तर बाष्पीभवन झाले आहे.

मुंबई : पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडवला. पश्चिम बंगालच्या निकालावरुन राज्यात महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्यांचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत पश्चिम बंगालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचा अदृश्य हात असल्याचे म्हटले होते. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे. शेलार मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

रोजंदारीवर जाणाऱ्या मजुराची पत्नी बनली आमदार!
 

यावेळी शेलार म्हणाले की, '' बंगालच्या विश्लेषणाची चर्चा सध्या सुरु आहे. भाजपचे केंद्रीय नेते याबद्दल अधिकृत विश्लेषण करतील. अपेक्षित यश मिळाले नाही आणि बॅनर्जीच्या पक्षाला यश मिळाले असे व्यक्तीश: वाटते. आम्ही ममता बॅनर्जी यांना पराभूत करु शकलो नाही हे सत्य आहे. आम्ही संपूर्ण विजय मिळवायचा या अपेक्षेने निवडणूक लढवली होती. पूर्ण विजय मिळाला नाही हेदेखील खरे आहे.''

''निवडणुकीतील यशाचे मोजमाप केले तर ते भाजपकडेच आहे. डावे पक्ष रसातळाला गेले. काँग्रेसचे तर बाष्पीभवन झाले आहे. ममता बॅनर्जींची वाढ हवी तशी झालेली नाही. असेही शेलार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, हा तर रडीचा डाव!

आव्हाडांच्या वक्तव्यावर बोलताना शेलार यांनी सांगितले की, ''यशामध्ये दावेदार कोण? छुपे, आडवे, उभे हात कोणाचे हे ज्यांचे चिन्ह हात आहे त्यांनी ठरवावे. आव्हाड असे म्हणत असतील तर ती अदृश्य शक्ती व हात कोणाचा याची चिंता काँग्रेसला जास्त करावी लागेल. आव्हाडांनी दिशादर्शन केले आहे, त्यामुळे काँग्रेस भुईसपाट झाली. काँग्रेसला भुईसपाट करण्याच्या यशमागचा आनंद व अदृश्य शक्ती आव्हाड सांगत आहेत का हा प्रश्न आहे'' असा टोला शेलार यांनी लगावला आहे. 

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले होते?

पश्चिम बंगालच्या निवडणुकांचे निकाल स्पष्ट होत असतांनाच आव्हाड यांनी ट्वीट केले होते. ते ट्वीटमध्ये म्हणाले होते की, ''पश्चिम बंगालच्या निकालावर भाजपचे निवडणूक प्रभारी कैलास विजयवर्गीय यांचा गौप्यस्फोट..!  ''शरद पवारांनी सर्व भाजपविरोधी पक्षांना ममता बॅनर्जींना साथ देण्यास भाग पाडल्याने मतविभागणी रोखली गेली. त्याचा फटका भाजपला बसलाय.'' याचा अर्थ शरद पवारांचा अदृश्य हात प. बंगालच्या निवडणुकीत होता..! असे आव्हाड यांनी म्हटले होते. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख