BJP Leader Ashish shelar criticise Opposition leader over mansukh hiren murder
BJP Leader Ashish shelar criticise Opposition leader over mansukh hiren murder

मनसुख हिरेन हत्याप्रकरणी आशिष शेलार यांचे धक्कादायक आरोप...

प्रकरणातील अनेक पुराव्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेलार यांनीकेला आहे.

मुंबई : मनसुख हिरेन हत्येचा तपास सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून केला जात आहे. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे हाच या प्रकरणाचा सुत्रधार असल्याचा दावा एटीएसने केला होता. पण त्यानंतर लगेचच या प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेला. त्यानंतर आता भाजपने या प्रकरणात सत्ताधारी पक्षातील नेते व मंत्र्यांच्या आदेशाने हिरेन प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. याची चौकशी एनआयएने करावी अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. 

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला तेव्हा त्यांच्या तोंडावर पांढला रुमाल होता. हे रुमाल शवविच्छेदन अहवालातून गायब झाले आहेत. या प्रकरणातील अनेक पुराव्यांशी छेडछाड करण्यात आल्याचा गंभीर आरोप शेलार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. पुराव्यांशी छेडछाड करणारे पोलिस, डॉक्टर, त्यांना आदेश देणारे मंत्री, नेते यांची चौकशी एनआयए ने करावी,  अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

हिरेन प्रकरण दाबण्यासाठी सरकारमधील कोण मंत्री काम करीत होते, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. मनसुख हिरेन यांच्या खुनाच्या केसमध्ये राज्य सरकारमधील मंत्री, नेते, अधिकारी मिळून एक मोठे षडयंत्र रचून या  केसमधील पुरावे नष्ट करणे, पुराव्यांशी छेडछाड करणे, तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न करीत होते, असे शेलार यांनी सांगितले.

शवविच्छेदन अहवालामध्ये मृतदेहासोबत सापडलेल्या वस्तुंच्या नोंदीत रुमालांची नोंद नाही. शवविच्छेदन करताना राष्ट्रीय मनावायोगाच्या नियमाप्रमाणे संपुर्ण चित्रण करावे लागते. या शवविच्छेदनासाठी दोन तास लागले. पण प्रत्यक्षात यातील एक-एक मिनिटाच्या सात ते आठ क्लिप व्हिडिओ का बनविण्यात आल्या, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे. 

मृतदेहाच्या फुफ्फुसामध्ये सापडलेल्या पाण्याची डायटोम टेस्ट करणे आवश्यक होते. हिरेन यांच्या शरीरात पाणी सापडले नाही, तरी त्यांचे अवयव डायटोम टेस्टसाठी का पाठवण्यात आले. ही टेस्ट जे जे रुण्णालयात होत नाही तशी परवानगी या रूग्णालयाला नाही. तरीही मनसुख यांचे अवयव जे जे रूग्णालयात उघडण्यात आले. या अवयावयांची छेडछाड करण्यासाठीच ते जे जे रुग्णालयात आणण्यात आले होते का, असा सवाल शेलार यांनी केला आहे. एटीएसला छापेमारी करून पुरावे गोळा करण्यास रोखण्यात आले. म्हणून राज्य सकारला ही केस एटीएसकडून एनआयएकडे द्यायची नव्हती, असा आरोप शेलार यांनी केला आहे.

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com