भाजप नेते आशिष शेलार कोरोना पॉझिटिव्ह 

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढतच असून अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे.
 Ashish Shelar .jpg
Ashish Shelar .jpg

मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप वाढतच असून अनेक राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार आशिष शेलार(Ashish Shelar) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

शेलार यांना बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तशी माहिती त्यांनी रात्री उशीरा ट्विटरद्वारे दिली. शेलार म्हणाले, ''माझी कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी औषधोपचार घेत असून जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी स्वत: ला वेगळे ठेवावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. मी माझ्या कार्यालयामार्फत मुंबईकरांच्या मदतीसाठी उपलब्ध आहे'' असे शेलार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात बुधवार पासून १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी दिवसभरात राज्यात तब्बल ५८ हजार ९५२ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यात आजपर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधितांचा आकडा ३५ लाख ७८ हजार १६० इतका झाला आहे. राज्यात ६ लाख १२ हजार ०७० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 

दिवसभरात ३९ हजार ६२४ रुग्ण बरे होऊन घरी परले आहेत. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ८१. २१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे मृतांचा आकडा खाली येण्याची चिन्ह दिसत नसून दिवसभरात एकूण २७८ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात आजपर्यंत एकूण ५८ हजार ८०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्याचा मृत्यूदर सध्या १. ६४ टक्के इतका आहे. दिवसभरात झालेल्या २७८ मत्यूंपैकी सर्वाधित ५४ मृत्यू हे मुंबई महानगर पालिका क्षेत्रामध्ये नोंदवण्यात आले आहेत. एकट्या मुंबईत आजपर्यंत कोरोनामुळे एकूण १२ हजार १४७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात दिवसभरात ४२०६ नवीन रुग्ण

पुणे शहरात बुधवारी दिवसभरात ४ हजार २०६ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरात एकून कोरोना रुग्णांची ३ लाख ४४ हजार २९ इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान ४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५ हजार ९०२ मृतांची संख्या झाली. ४ हजार ८९५ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. शहरात २ लाख ८४ हजार ८०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com