भाजप नगरसेविकेच्या पतीवर कोयत्याने हल्ला - bjp ganesh naik supporter sandeep mhatre attacked with sickle | Politics Marathi News - Sarkarnama

भाजप नगरसेविकेच्या पतीवर कोयत्याने हल्ला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 28 जून 2021

गणेश नाईक यांचे समर्थक संदीप म्हात्रे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे.

नवी मुंबई : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचे समर्थक संदीप म्हात्रे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना नुकतीच घेतली आहे. नवी मुंबईत संदीप म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात ही घटना घडली. या हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. bjp ganesh naik supporter sandeep mhatre attacked with sickle

दोन व्यक्तींनी म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयात घूसून  त्यांच्यावर कोयत्याने वार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या हल्ल्याचे कारण अद्याप कळू शकले नाही. म्हात्रे हे गंभीर जखमी झाले असून त्यांनी वाशीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एका हल्लेखोराला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

स्थानिक भाजप नगरसेविका संगीता म्हात्रे यांचे संदीप म्हात्रे हे पती आहेत. रविवारी रात्री आपल्या कार्यकर्त्यांसोबत कार्यालयात बसले होते. तेव्हा दोन तरुण अचानक कार्यालयात आले व त्यांनी म्हात्रे यांना तुम्हाला ठार मारु असं म्हणत त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. समयसूचकता दाखवत म्हात्रेंनी हा वार चुकवला. यात त्यांच्या खांद्याला गंभीर दुखापत झाली आहे. रक्तबंबाळ अवस्थेतील म्हात्रेंनी स्थानिकांनी मनपा रुग्णालयात दाखल केलं.

विक्रमी लसीकरणाचा दावा खोटा ; मोदीजी, भारतीयांचे आयुष्य जनसंपर्क मोहिमेचे साधन नाही!
मुंबई  : राष्ट्रीय लसीकरण मोहिमेतील विक्रमी लसीकरणाच्या दावा नुकताच केंद्र सरकारने केला आहे. ''या दावा खोटा असून भारतीयांचे आयुष्य म्हणजे जनसंपर्क मोहिमेचे साधन नाही, हे भाजपला दाखवून देण्याची गरज आहे, '' असा टोला गृहराज्यमंत्री व काँग्रेस नेते सतेज पाटील त्यांनी लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकांच्या आयुष्याशी खेळत खोटी आकडेवारी दिल्याची केली टीकाही त्यांनी केली आहे.  
Edited by : Mangesh Mahale

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख