ठाकरे सरकारची खासगी रुग्णालयांशी मिलीभगत: किरीट सोमय्या

ही आत्महत्या आहे की हत्या, याची चौकशी झाली पाहिजे. मी भोईवाड़ा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
bjp ex mp kirit somayya criticizes thackrey government on covid management
bjp ex mp kirit somayya criticizes thackrey government on covid management

मुंबई: कोविड रूग्णांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. ठाकरे सरकारची खासगी रूग्णालयांशी मिलीभगत असल्यानेच रूग्णांना लुटले जात असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.

पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले, गेली 2 महिने लोक कोविडच्या औषधासाठी रडत आहेत आणि मंत्री धाडी मारण्याचे नाटक करत आहेत. हे सरकार खोटं बोलत आहे. चार हजारचे इंजेक्शन 40 हजाराला विकले जात आहे. यासंदर्भाने आतापर्यंत किती लोकांवर कारवाई केली, याचा आकडा जाहीर करावा. अश्याच पद्धतीने खासगी रुग्णालये लूटमार करत असतील आणि सरकार कारवाई करत नसेल तर आम्ही कोर्टात जाणार, असेही सोमय्या म्हणाले.

'केइएम'मध्ये रुग्ण आत्महत्या करतो, ही लाजिरवाणी बाब आहे. वार्डमध्ये 100 लोक होते त्यावेळेस आत्महत्या केली गेली. महापौर आणि महापालिका आयुक्तांनी याचे उत्तर द्यायला पाहिजे. ही आत्महत्या आहे की हत्या, याची चौकशी झाली पाहिजे. मी भोईवाड़ा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिल्याचे सोमय्या यांनी सांगितले.


महापालिका आयुक्त आम्हाला काय मूर्ख समझतात का? त्यांनी राजकीय स्टंटबाजी करू नये.
 
 

रामदास आठवलेंचीही ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यात दलित आणि बौद्धांवर अत्याचार वाढत आहेत, असा आरोप रिपब्लिकन नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.

लॉक डाऊनच्या काळातही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दलितांवर हल्ले झाल्याचे, घरे जाळल्याचे, दलित बौद्ध तरुणांच्या हत्या झाल्याचे निषेधार्ह प्रकार घडले आहेत. वाढत असलेले अत्याचार रोखण्याकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत आहे. ते रोखण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले आहे. या अत्याचारांच्या निषेधार्थ दि. 11 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र निषेध आंदोलन करण्यात येणार आहे, असे आठवले यांनी सांगितले.

दि. 11 जुलै 1997 रोजी घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या आंबेडकरी अनुयायांवर बेछूट गोळीबार करण्यात आला होता. त्यात 11 जण मृत्यूमुखी पडले होते. त्यांचा स्मृतिदिन दरवर्षी दि.11 जुलै रोजी आंबेडकरी जनता पाळते तसेच या बेछूट गोळीबाराच्या निषेधार्थ आंदोलन करते. त्यामुळे उद्या दि. 11 जुलै रोजी महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते राज्यभर आंदोलन करणार आहेत.

edited by swarup jankar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com