सहा आठवड्याचं अधिवेशन बोलवा, मगच विरोधकांच्या भूमिकेवर मत व्यक्त करा..राऊतांना टोला

चित्रा वाघ यांनी टि्वट करीत ''महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरुन दिसतंय,'' असा टोला राऊतांना लगावला आहे.
Sarkarnama Banner - 2021-06-30T094431.383.jpg
Sarkarnama Banner - 2021-06-30T094431.383.jpg

मुंबई : 'महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असू शकतात पण याचा अर्थ नाराजी आहे, असा होत नाही, सरकारमधील तीनही पक्षामध्ये समन्वय आहे, हे सरकार पाच वर्ष टिकेल, ' असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी नुकताच व्यक्त केला आहे. यावर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टोमणा मारला आहे. bjp chitra wagh slams mp sanjay raut over mahavikas aghadi sarkar

भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी टि्वट करीत ''महाविकास आघाडीत किती आलबेलं आहे हे त्यांच्या येरझाऱ्यांवरुन दिसतंय,'' असा टोला राऊतांना लगावला आहे. 'एकच कोडं कुणीही हरामखोर म्हणलेलं नसताना मी हरामखोर नाही हे का सिद्ध करावं लागतंय? संजयजी माझं आवाहन की तुम्ही ६ आठवड्याचं अधिवेशन बोलवावं आणि मगच विरोधकांच्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करावं" असे वाघ यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे. 

भाजपमधील त्रिकुटाने माझा विश्वासघात केला
 बंगळूर : भारतीय जनता पक्षाच्या त्रिकुटाने माझा विश्वासघात केला. वेळ आल्यावर त्यांची नावे जाहीर करू, ते माझा तिरस्कार करतात, योग्य वेळी त्यांना धडा शिकवू, असा इशारा माजी मंत्री व आमदार रमेश जारकीहोळी यांनी स्वपक्षीय नेत्यांनाच दिला. आमदार जारकीहोळी अचानक सोमवार (ता. २८ जून) रात्री दिल्लीला रवाना झाले. रात्री दोनला अचानक फोन आल्याने दिल्लीला यावे लागले, असे त्यांनी सांगितले. त्यांनी आरएसएसच्या एका नेत्याच्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक घेऊन चर्चा केल्याचे समजते.  रमेश जारकीहोळी यांनी दिल्लीला पोचल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. एका आरएसएस नेत्याच्या घरी सुमारे ४५ मिनिटे बैठक झाली. बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे समजू शकले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे. दिल्लीत जारकीहोळी आणखी काही भाजप नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com