डिस्को, बार, आरोग्य केंद्र आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल 

थोडी तरी संवेदनशीलता मुख्यमंत्र्यांनीदाखवावी”, असे शेलार म्हणाले.
डिस्को, बार, आरोग्य केंद्र आहेत का? शेलारांचा मुख्यमंत्र्यांना सवाल 
2Sarkarnama_20Banner_20_202021_08_05T154741.253_1.jpg

मुंबई : राज्यातील कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. मॉल, बार यांना परवानगी देण्यात आली आहे. तर मंदिरे अद्यापही बंद आहेत. मंदिरे उघडण्यावरुन भाजप आणि मनसेने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले आहे.

भाजपचे नेते आशिष शेलार Ashish Shelar यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर याबाबत टीका केली आहे. शेलार यांनी ठाकरे सरकारवर Uddhav Thackeray आरोप करत काही प्रश्न केले आहेत. शेलार माध्यमांशी बोलत होते. 

राज्यात सुरू असलेली डिस्को, बार, पब ही आरोग्य केंद्र आहेत का? असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. ''सध्या आरोग्य मंदिरांचीच गरज असून इतर मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडली जातील,'' असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला टोला लगावला होता. याला आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. 

भक्तांची देवापासून ताटातूट करण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणून कोरोना बंदीचा कार्यक्रम नाही ; तर देऊळबंदीच शिवसेनेचे अभियान आहे, अशी टीकाही शेलार यांनी केली. ठाणे जिल्ह्यामध्ये आदिवासी पाड्यातील ७४१ बालकांचा सहा महिन्यांत मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. तेथील आरोग्य व्यवस्था कुठे आहे, असा सवालही त्यांनी केला. 

कोविड सेंटर, आयसोलेशन सेंटर, सॅनिटायझर वाटप या सगळ्यांमध्ये काही कमिशनची प्रकरणे समोर येत आहेत. त्यावर मुख्यमंत्री कधी भाष्य करणार, असा प्रश्नही शेलार यांनी केला. मॉलमधील कामगारांचे कारण सांगून मॉल उघडे केले ; मग मंदिरांच्या बाहेर नारळ, अगरबत्ती, धूप, फूल विकणारे यांची उपासमार मुख्यमंत्र्यांना दिसत नाही का, असे शेलार यांनी विचारले. भक्त आणि देव यांची ताटातूट करण्याचे काम शिवसेना करत आहे.

आरोग्य व्यवस्था, कुठे आहेत आरोग्य केंद्रे? कुठे आहेत पायाभुत सुविधा? महानगरपालिकेच्या रुग्णालयात डोळा कुरतडून खाल्ला म्हणुन मृत्यू, सायन ते नायर शवाच्या बाजूला जिवंत माणसाची ट्रिटमेंट, कोविड सेंटरमध्ये टॉयलेट मधे मृत्यू आणि आता बालकांचा मृत्यू, थोडी तरी संवेदनशीलता मुख्यमंत्र्यांनी  दाखवावी”, असे शेलार म्हणाले.

Related Stories

No stories found.