कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'या' राज्यात आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द...  - Bihar government cancels leaves of doctors, healthcare staff till april 5  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'या' राज्यात आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द... 

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 19 मार्च 2021

बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सुट्या रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले.

बिहार: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकारने सर्व डाॅक्टर्स, आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्याचे वृत्त आहे. देशासह बिहारमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून खबरदारीचा उपाय म्हणून सर्व सुट्या रद्द करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. आयसीयू बेड्सची उपलब्धता, व्हेंटिलेटरची उपलब्धता, आदी गोष्टी तयार ठेवल्या जातील. तसेच आरोग्य सुविधा २४ तास खुल्या राहतील, असेही बिहार सरकारकडून सांगण्यात आले.   

दरम्यान, बिहारच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील डाॅक्टर्स व आरोग्य सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या जाऊ शकतात, अशी चिन्हे दिसत आहेत. बिहारमध्ये गुरूवारी १०७ जणांना कोरोनाची लागण झाली असून सद्यःस्थितीत ४०६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर १५५५ जणांचा मृत्यू झाला आहे. परिणामी ५ एप्रिलपर्यंत सुट्या रद्दचा निर्णय बिहार सरकारच्या आरोग्य विभागाकडून घेण्यात आला.  

दरम्यान, देशात गेल्या २४ तासात ३९ हजार ७२६ जणांना कोरोनाची लागण झाली. इंडिया काउन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या नोंदीनुसार आतापर्यंत कोरोनाचे तब्बल २३ कोटी १३ लाख ७० हजार सँपल गोळा केले आहेत. त्यापैकी १० लाख ५७ हजार सँपल गुरूवारी गोळा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख