भिवंडी मनपा कर्मचाऱ्यांना नऊ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर - Bhiwandi Municipal Corporation employees Sanugrah grant of nine thousand announced | Politics Marathi News - Sarkarnama

भिवंडी मनपा कर्मचाऱ्यांना नऊ हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 29 ऑक्टोबर 2020

पालिकेच्या कर्मचारी कामगारांना 9 हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

भिवंडी : भिवंडी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना महापौर प्रतिभा पाटील यांनी 9 हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान म्हणून जाहीर केले आहे.तसेच कोरोना संक्रमण काळात कर्मचारी कामगारांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक आहे असे गौरवास्पद मत महापौर पाटील यांनी यावेळी व्यक्त करून अधिक जोमाने काम करा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

त्यामुळे आयोजित बैठकीत कामगार कर्मचारी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापौर पाटील व आयुक्त डॉ.पंकज आशिया यांचे सह उपस्थित नगरसेवकांचे आभार मानले आहेत.दिवाळी सानुग्रह अनुदान बाबत चर्चा करण्यासाठी महापौर प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेचा दालनात मिटींग आयोजित केली होती.

यावेळी आयुक्त डॉ.पंकज आशिया ,उपमहापौर इम्रान खान ,सभागृह नेते विलास पाटील, विरोधी पक्षनेते यशवंत टावरे, यांच्या सह युनियनचे पदाधिकारी घनःश्याम गायकवाड,भानुदास भसाळे, महेंद्र गायकवाड,संतोष चव्हाण, महेंद्र कुभारे,श्रीपत तांबे,किरण चन्ने,राजेश जाधव, राजु चव्हाण, दिपक राव, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त दिपक सावंत उपस्थित होते.

कोरोना सावटामुुळे भिवंडी मनपाची आर्थिक परिस्थिती खालावली, कोरोनाचा पार्श्वभूमीवर ठप्प झालेले कामकाज, त्यामुळे वसुलीवर झालेला परिणाम  या सर्व बाबींचा विचार करता यावर्षी दिवाळी सानुग्रह अनुदान मिळण्याविषयी साशंकता होती.

मात्र पालिकेच्या कामगार कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या भयंकर संक्रमण काळात आपल्या जिवाजी बाजी लावून कर्तव्य बजावले ही बाब महापौर प्रतिभा पाटील,आयुक्तच्या निदर्शनास  संघटनेच्या पदाधिकारी यांनी आणून दिली.

त्यामुळे महापौरांनी आयुक्त व नगरसेवक गटनेते यांच्याशी चर्चा करून पालिकेच्या कर्मचारी कामगारांना 9 हजार रुपये दिवाळी सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली.त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख