शिवसेनेला भारतरत्न द्या..निलेश राणेंचा टोला  - Bharat ratna should be given to shiv sena nilesh rane attack on uddhav Thackaray | Politics Marathi News - Sarkarnama

शिवसेनेला भारतरत्न द्या..निलेश राणेंचा टोला 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

नाणार आणि जैतापूर प्रकल्पाबाबत भाजपचे नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे.

मुंबई : नाणार आणि जैतापूर प्रकल्पावरून सध्या राजकारण तापलं आहे. याबाबत काल शिवेसेनेचे लांजा – राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, ''सध्या कोकणात उद्योगधंदे नाहीत. स्थानिकांनी पाठिंबा दिल्यास नाणारबाबत आघाडी सरकार सकारात्मक भूमिका घेईल,''

या विधानामुळे साळवी अडचणीत आले आहे. त्यांच्या या विधानावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलासा करावा लागला आहे. आता नाणार आणि जैतापूर प्रकल्पाबाबत भाजपचे नेते निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे. निलेश राणे याबाबत टि्वट केलं आहे.

ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, ''प्रकल्पाला अगोदर विरोध करायचा आणि सेटलमेंट झाल्यानंतर स्थानिकांचा विरोध मावळला सांगून प्रकल्पाचे समर्थन करायचं. हेच धंदे करत करत इथंपर्यंत आले आहेत. प्रकल्पाला विरोध करून सेटलमेंट झाल्यावर समर्थन कसं करायचं यासाठी शिवसेनेला भारतरत्न दिला पाहिजे.''

निलेश राणे म्हणतात की शिवसेना आमदार राजन साळवी यांनी जैतापुर व नाणार प्रकल्पाला जर लोकांचे समर्थन असेल तर विचार करू असं बोलल्यानंतर मागून आलेल्या शिवसैनिकांनी त्यांना फटकारले. ही इज्जत एका निष्ठावंत शिवसैनिकाला आजच्या शिवसेनेमध्ये मिळते. ज्याच्याकडे गांधीजी तोच खरा शिवसैनिक हे आज शिवसेनेत चित्र आहे.

हेही वाचा मराठा आरक्षण धोका निर्माण झाल्यास सरकार जबाबदार..संभाजीराजे
मुंबई : "मराठा आरक्षणाला धोका निर्माण झाला तर त्याला सरकारच जबाबदार राहणार," असा हल्लाबोल खासदार संभाजीराजे यांनी आज महाविकास आघाडीवर केला आहे. संभाजीराजे पत्रकार परिषदेत बोलत होते. 
ठाकरे सरकारने मराठा समाजासाठी काल महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या समाजाला आर्थिकदृष्टया मागासवर्ग (ईडब्ल्यूएस) सवलती देण्याचे कालच्या मंत्रीमंडळ बैठकीत ठरविण्यात आले. रखडलेल्या प्रवेशप्रक्रिया, नोकरभरती या निर्णयामुळे मार्गी लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे पत्रकारांशी बोलत होते. ''ईडब्यूएस आरक्षण हे काही फक्त मराठ्यासाठीच आरक्षण नाही तर ते आर्थिकदृष्या मागासवर्गीस असलेल्या तर खुल्या वर्गात येणाऱ्या अन्य समाजासाठीही लागू आहे. आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण दिल्यामुळे एसईबीसी आरक्षणाला धोका निर्माण होणार का, असा प्रश्न संभाजीराजे यांनी उपस्थित केला आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख