भाजपची भूमिका कायमच संशयास्पद... - Bhai jagtap press in mumbai | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र एटीएसची मोठी कारवाई , 7 किलोग्राम यूरेनियमसह 2 जणांना अटक. दोन्ही आरोपी मागिल अनेक दिवसांपासून ग्राहकांच्या शोधात होते. जप्त केलेल्या युरेनियमची किंमत बाजारात २१ कोटी रुपये आहे.
गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या साताऱ्यातील घरासमोर अज्ञाताने शेणी पेटवल्या, त्यामुळे साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पेटवलेल्या शेणी विझवून तेथून हटविल्या आहेत .

भाजपची भूमिका कायमच संशयास्पद...

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 15 मार्च 2021

भाई जगताप यांचा घणाघाती आरोप 

मुंबई : सचिन वाझे यांचे निलंबन नियमानुसार क्रमप्राप्तच होते. त्याकरिता मागणी करावी लागत नाही. सुशांत सिंग प्रकरणामध्ये अख्खी एक निवडणूक लढवली गेली. आता या प्रकरणाचे काय झाले? या साऱ्या प्रकाराबाबत भाजपची भूमिका कायमच संशयास्पद राहिली असून त्यांनी वेळोवेळी केवळ राजकारणच केले आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी सोमवारी मुंबईतील पत्रकार परिषदेत केला. 

एनआयए व मुंबई पोलिसांना त्यांचे काम करू द्यायला हवे व त्यामध्ये कुणीही ढवळाढवळ करू नये, असेही जगताप यांनी नमूद केले. मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत बोलताना ते म्हणाले की, मुंबईत कोरोना रुग्णांमध्ये दररोज 20 ते 30 टक्के वाढ होत असून आरोग्याकडे सर्वांनीच लक्ष देणे गरजेचे आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरीदेखील अद्याप मुंबईमध्ये लाॅकडाऊनसारखी परिस्थिती नाही. प्रशासन काही हाॅटस्पाॅटच्या ठिकाणी निर्बंध लावू शकते, असेही जगताप यांनी स्पष्ट केले. 

मुंबई उपनगरांमधील कोरोनाच्या रुग्णसंख्येबाबत मात्र जगताप यांनी चिंता व्यक्त केली आहे. उपनगरातील काही माॅल्समध्ये लोक खरेदीसाठी मोठी गर्दी करत असून असे गर्दी होणारे माॅल्स, डिपार्टमेन्टल स्टोअर्स तातडीने बंद केले पाहिजेत, असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी सुरक्षित वावर, मास्क वापरणे, सॅनिटायझर, आदींचा उपयोग करून कोरोनाला परतावून लावावे, असे आवाहनही जगताप यांनी केले.       

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख