'बार्टी'तर्फे MPSC परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग क्लास 

कोरोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन क्लासेस सुरू करावे अशा सूचना दिल्या होत्या.त्या अनुषंगाने बार्टी ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
BARTI will start mpsc online coaching class
BARTI will start mpsc online coaching class

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (बार्टी ) मार्फत महाराष्ट्रातील सर्व उमेदवारांसाठी एम.पी.एस.सी. परीक्षेसाठी ऑनलाईन कोचिंग  सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. 

कोरोनामुळे खूप एमपीएससी इच्छुक  विद्यार्थी याबाबत मागणी करत होते. त्यानंतर मुंडे यांनी बार्टीला याबाबत ऑनलाइन क्लासेस सुरू करावे अशा सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने बार्टी ने स्वत: पुढाकार घेऊन ऑनलाइन एमपीएससी क्लासेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 

एम. पी.एस.सी.  इच्छुक उमेदवारांकडून यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी बार्टी, पुणे या www.barti.in या संकेतस्थळावर नोटीस बोर्ड वरील “एम.पी.एस.सी. परीक्षा मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश अर्ज या लिंक वर क्लिक  करावे. ऑनलाईन कोचिंग चे बार्टीचे फेसबुक पेज व चुट्यूब चैनल वरून लाईव्ह स्ट्रिमिंग करण्यात येणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी आजपासून नोंदणी  सुरू करावी असे आवाहन करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात हे क्लासेस सुरू होतील अशा दृष्टीने नियोजन करावे अशा सूचनाही मंत्री महोदयांनी दिल्या आहेत. तर सर्व तयारी करून पुढील आठवड्यात  याचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे बार्टीचे महासंचालक कैलास कणसे यांनी सांगितले.

हरी नरके यांच्या लेखावरून वादंग

पुणे: पुरोगामी विचारवंत प्रा. हरी नरके यांनी लिहलेल्या एका लेखात व्यसनाधिनता व महिला हिंसाचारासंदर्भात मांडलेल्या मुद्यांवर बौद्ध समाजातील काही लोकांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून सोशल मिडीयावर टीकाटिप्पण्णी सुरू होती. अखेर याप्रकणात दिलगिरी व्यक्त करून हरी नरके यांनी वादावर पडदा टाकला आहे.

हरी नरके यांनी २६ जुन २०२० रोजी शाहू जयंतीनिमित्त लेख लिहला होता. छ. शाहूराजांचा रिलेव्हन्स काय? असे त्या लेखाचे शिर्षक होते. 'फुले-शाहू-आंबेडकर यांच्यात ४२ गोष्टींबाबत साम्य होते.त्यातली एक म्हणजे हे तिघेही निर्व्यसनी होते. संपुर्ण निर्व्यसनी' असा उल्लेख करून नरके यांनी दहाव्या मुद्यात व्यसनाधिनता आणि घरेलू हिंसाचारासंदर्भात काही मांडणी केली होती. त्या मांडणीला बौद्ध समाजातून आक्षेप घेण्यात आला होता. नरके यांच्यावर टीका टिप्पण्णी करण्यात येत होती. अनेकांनी नरके यांची मांडणी बरोबर असल्याचेही म्हटले होते. सोशल मिडीयावर हा वाद तीव्रतेने गाजत होता. त्यावर दिलगिरी व्यक्त करून हरी नरके यांनी वादावर पडदा टाकला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com