थोरात एक वर्षाचे तर काँग्रेस आमदार एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री साह्यता निधीला देणार

लसीकरणासाठी येणारा खर्च मोठा आहे. त्यामुळेच माझे वर्षभराचे मानधन राज्यासाठी देणार आहे. यासोबतच काँग्रेसचे ५३ आमदार आपले महिन्याभराचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Balasaheb Thorat .jpg
Balasaheb Thorat .jpg

मुंबई : काँग्रेसचे नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहे थोरात यांनी आपले वर्षभराचे व काँग्रेस आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री साह्यता निधील देणार असल्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर मोफत लसीकरणाबाबत महाविकास आघाडी सरकारचे एकमत असल्याचंही त्यांनी सांगितले. गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी लसीकरणाबद्दल बोलताना थोरात म्हणाले की ''आम्ही मोफत लसीकरणाबाबत आग्रही आहोत. लसीकरणासाठी येणारा खर्च मोठा आहे. त्यामुळेच माझे वर्षभराचे मानधन राज्यासाठी देणार आहे. यासोबतच काँग्रेसचे ५३ आमदार आपले महिन्याभराचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र काँग्रेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपये देणार असल्याचेही थोरात यांनी सांगितले.

त्याचसोबत मोफत लसीकरणासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोघेही आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले आहे. देशभरात १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. मात्र, राज्यात मात्र लसींचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने १ मेपासून राज्यात लसीकरण सुरु होणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी सांगितले आहे. 

राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील ५ कोटी ७१ लाख लोकसंख्या आहे. या सर्वांचे मोफत लसीकरण करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली होती.

राज्यात १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे १ मेपासून लसीकरण करण्याची तयारी सकारने केली होती. मात्र, राज्याकडे लशींचा पुरेसा साठा नसल्याने या वयोगटाचे लसीकरण लांबणीवर टाकण्यात आल्याचे टोपे यांनी सांगितले. मोफत लस सरकारी रुग्णालये किंवा आरोग्य केंद्रांवरच उपलब्ध होणार असल्याचे टोपे यांनी सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com