Sharad Pawar, Balasaheb Thorat .jpg
Sharad Pawar, Balasaheb Thorat .jpg

थोरात म्हणाले टीका टीपणी करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र या!

राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकल्याचा अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

मुंबई : सध्याची काँग्रेसची अवस्था हवेली दुरुस्ती करण्याचीही ताकद नसलेल्या जमीनदारासारखी झाली आहे. असे व्यक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्यावर काँग्रेस नेते व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Balasaheb Thorat said on Sharad Pawar's statement) 

थोरात म्हणाले, शरद पवार यांच्या विधानाशी असहमत आहे. काँग्रेसने जमीनदारी केली नाही. काँग्रेस एक पुरोगामी विचार आहे. या तत्वाला कठीण दिवस आले आहेत. माणसात समाजात भेद निर्माण केले जात आहे. जे एका विचाराचे आहेत त्यांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यायला हवे, टीका टिपणी करण्यापेक्षा यूपीए म्हणून एकत्र होतो. सहकारी म्हणून एकत्र होतो. यूपीएचा कारभार चांगला झाला होता, असे थोरात यांनी सांगितले.   

राज्य सरकारला निवडणुका पुढे ढकल्याचा अधिकार नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यावर थोरत म्हणाले, आम्ही सर्वपक्षीय एकत्र येऊन निर्णय करत आहोत. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यावर एकत्र चर्चा करून निर्णय घेऊ. ओबीसींला न्याय देऊ. न्यायालयाने निर्णय दिला त्यानुसार काम करत आहोत. वेळ निघून चालला असे नाही. निवडणुकीला वेळ आहे.

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते की, मला एक मंत्री म्हणाले की भर चौकात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोबाडीत मारले तरी आम्ही सत्ता सोडणार नाही. त्यावर थोरात म्हणाले, हे बोलणे म्हणजे गंमत करणे आहे. चंद्रकांत पाटील आजकाल गंमत करत आहे, असा टोला लगावला. 

शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. त्यावर थोरात यांनी सांगितले की, त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांचे धोरण ते ठरवू शकतात. भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या बोलतात आणि ईडी वागते अस लोकांना वाटत आहे. तपास यंत्रणांचा वापर आता राजकारणासाठी होतो हे कळून चुकले आहे. मुंबईमध्ये साकीनाका भागात घडलेल्या बलात्काराची घटना दुर्देवी आहे. जे गुन्हेगार आहेत त्यांना तातडीने शिक्षा झाली पाहिजे याची काळजी घेऊ, असेही थोरात यांनी सांगितले. 

Edited By - Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com