बाळा नांदगावकर म्हणतात.. नाणारला अर्थबुद्धीने नव्हे सदसदविवकेबुद्धीने पाठिंबा

नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सदसदविवकेबुद्धीने पाठिंबा दिला आहे,
bala nanadgovkar .jpg
bala nanadgovkar .jpg

मुंबई : नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सदसदविवकेबुद्धीने पाठिंबा दिला आहे, अर्थबुद्धीने नव्हे, असे सांगत नाणारसाठी वेळ पडल्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटू शकतात, असे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. तसेच नाणारला आम्ही सुरुवातीला विरोध केला होता. परंतु, महाराष्ट्राची वास्तविक स्थिती पाहता राज्याच्या आणि कोकणाच्या हितासाठी हा प्रकल्प आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 

राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला पाठिंबा देतानाच हा प्रकल्प पूर्ण करण्याची गळ त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून घातली. बाळा नांदगावकर त्यावर बोलत होते. कोकणात प्रत्यक्ष जाऊन तिथल्या आंदोलकांना राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. आता त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधायचा आहे. पर्यावरणाचा प्रदूषणाचा आणि निसर्गाचा समतोल साधून आपल्या लोकांना रोजगार कसा मिळेल? उद्योग कसा मिळेल? या सगळ्याची सांगड घालून प्रकल्पाला पाठिंबा देत आहोत, असे नांदगावकर यांनी सांगितले. नाणारप्रकरणी राज ठाकरे यांचे मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याबाबत अजून काही ठरलेले नाही. पण त्यांनी पत्रं लिहिले आहे. मात्र, वेळ पडल्यास ते मुख्यमंत्र्यांनाही भेटू शकतात, असे सांगतानाच राज यांचा कोकण दौराही अद्याप ठरलेला नसल्याचे नांदगावकर यांनी सांगितले. 

या प्रकल्पाबाबतच्या शेतकऱ्यांमध्ये असलेल्या शंकाकुशंका दूर केल्या पाहिजेत. किंबहुना तिकडे पर्यावरणवादी आहे. महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरणाबाबत त्यांच्या मनात शंका आहेत, म्हणून हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रच्या हिताचा आहे. कोरोनाच्या वेळेला अशा प्रकारचा प्रकल्प येत असेल तर तो प्रकल्प महाराष्ट्राच्या दृष्टीने फायद्याचा आहे. त्यामुळे राज्याची हानी होणार की तोटा होणार नाही यासाठी प्रकल्प हवा आहे. या अगोदर एक प्रकल्प बंगलोरला गेला आहे. त्याच्यामुळे हा प्रकल्प राज्याच्या दृष्टीने विचार करून हवा, असे नांदगावकर म्हणाले. 

आंदोलकांना विश्वासात घ्या

नाणार प्रकल्पाला ज्यांचा विरोध आहे त्यांना विश्वासात घेऊन हा प्रकल्प होणे गरजेचे आहे. जेणेकरून कोकणाचे पर्यावरण, निसर्ग सौंदर्य, प्रदूषण या गोष्टीचा विचार करून नाणार प्रकल्प राबवला गेला पाहिजे, असे सांगतानाच शिवसेनेतही या प्रकल्पावरून दोन गट आहेत. संभ्रम आहे. स्थानिक आमदार राजन साळवी यांनी हा प्रकल्प व्हावा म्हणून भूमिका माडंली होती, असेही ते म्हणाले. नाणारला आम्ही सुरुवातीला विरोध केला होता. परंतु, या राज्याची वास्तविक स्थिती पाहता महाराष्ट्राच्या आणि कोकणाच्या हितासाठी हा प्रकल्प आवश्यक आहे. प्रकल्पाचा आम्ही अर्थबुद्धीने विचार करत नाही. आमच्या सदसदविवेकबुद्धीला ते योग्य वाटले म्हणून आम्ही भूमिका मांडली. मनसेने कुठल्याही प्रकारचा यू टर्न घेतला नाही, असेही नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

अयोध्येला जाणार

राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. त्यावरही नांदगावकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.  उत्तर प्रदेश सरकारशी अयोध्या दौऱ्याबाबत चर्चा सुरू आहे. दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याला शंभर दिवस झाले. या संदर्भात चर्चा करूनच निर्णय घेऊ, असेही ते म्हणाले.  
 
Edited By - Amol Jaybhaye
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com