अजून किती लोकांचे बळी घेतल्यावर सरकारला जाग येणार?
03Sarkarnama_20Banner_20_202021_05_06T095805.256_1.jpg

अजून किती लोकांचे बळी घेतल्यावर सरकारला जाग येणार?

वेळेत मदत न पोहोचल्यामुळे २०० पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले.

मुंबई :  गेल्या पाच दिवसांपासून कोकणात पूर सदृश परिस्थिती आहे. गुरुवारी तीन ठिकाणी दरड कोसळली असताना सुद्धा राज्य सरकारने नौदल व तटरक्षक दलाला बोलविण्यासाठी शुक्रवारी पत्र दिले, त्यामुळे वेळेत मदत न पोहोचल्यामुळे २०० पेक्षा जास्त नागरिकांचे नाहक बळी गेले. हे अत्यंत संतापजनक असून मुख्यमंत्री व राज्य सरकारच्या या अनास्थेची व दिरंगाईची न्यायिक चौकशी करा, अशी मागणी भाजप मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

पावसाळा सुरू होतानाच कुठल्याही आपत्तीचा सामना करण्यासाठी नौदल व तटरक्षक दलाच्या तुकड्या सज्ज असतात, राज्य सरकारकडून त्यांना आदेश येताच ते तात्काळ मदतकार्य सुरू करतात.  बुधवारी रात्रीपासून संपूर्ण चिपळूण शहर पाण्याखाली गेले असताना व गुरुवारी सकाळी तळीये येथे दरड कोसळली असताना राज्य सरकारने तात्काळ तटरक्षक दल व नौदलाला मदतीसाठी लेखी आदेश देण्याची आवश्यकता होती. 

राज्यातील गंभीर पूरस्थिती लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारीच मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा केली व आवश्यक सर्व मदत करण्याचे आश्वासन सुद्धा दिले होते. परंतु निष्क्रिय व घरबस्या ठाकरे सरकारला मदतीचे पत्र लिहिण्यासाठी २४ तास लागले. ही दिरंगाई अक्षम्य असून अजून किती लोकांचे बळी घेतल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला जाग येणार आहे? असा सवाल सुद्धा आमदार भातखळकर यांनी केला आहे.

संकटात जनतेला पाठ  दाखवणारे अनिल परब हे तर पळपुटे मंत्री
मुंबई :  महापुरामुळे राज्यातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना मोठा फटका बसला आहे.  चिपळूणला प्रशासकीय यंत्रणा अपूर्ण पडत आहे. यावरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चिपळूणचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. अनिल परब यांनी पुरग्रस्तांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करणार असल्याची घोषणा केली होती. 
Edited by : Mangesh Mahale

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in