संजय राठोड यांचा बेशरमपणाचा कळस; अतुल भातखळकर यांची टीका

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात झालेले आरोप वनमंत्री संजय राठोड यांनी फेटाळले आहेत.
Atul Bhatkhalkar criticise sanjay rathore over pooja chavan death case
Atul Bhatkhalkar criticise sanjay rathore over pooja chavan death case

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात झालेले आरोप वनमंत्री संजय राठोड यांनी फेटाळले आहेत. पूजाच्या मृत्यूनंतर ते आज पहिल्यांदाच समोर आले असून त्यांनी आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे. यावरून भाजपकडून राठोड यांच्यासह राज्य सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी राठोड यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, संजय राठोड १५ दिवस फरार होते. आता ते शक्तीप्रदर्शन करत आहेत. पण हे करून काहीही होणार नाही. त्यांची आजची अवस्था म्हणजे 'सामना'मधल्या भेदरलेल्या सरपंचसारखी झालीय. निर्लज्जपणा आणि बेशरमपणाचा कळस काय असू शकतो, हे  संजय राठोड यांच्या वक्तव्यावरून दिसते.

राठोड यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही. समाजाच्या नावावर भावनिक शब्द बोलून ते निघून गेले. ऑडिओ क्लिपमधल्या आवाजावर ते काहीच बोलले नाहीत. आई-बाबांचे नाव घेऊन निघून गेले. संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी, अशी मागणीही भातखळकर यांनी केली. 

दरम्यान, राठोड माध्यमांशी बोलताना म्हणाले, गोरबंजारा समाजातील मुलगी पूजा चव्हाण हीचा पुणे शहरातील वानवाडी परिसरात मृत्यू झाला. तिच्या मृत्यूचे दुःख मला, माझ्या कुटुंबीयांना आणि संपूर्ण बंजारा समाजाला आहे. पण या घटनेनंतर माझ्यावर विरोधकांकडून बिनबुडाचे आरोप करण्यात आले. अतिशय घाणेरडं राजकारण केले जात आहे. ते अतिशय चुकीचं आणि निराधार आहे. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. या एका घटनेमुळे मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू नका, असे राठोड यांनी सांगितले. 

राठोड म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. चौकशीनंतर प्रकरणातील सत्य काय ते समोर येणारच आहे. विविध माध्यमांतून माझी, माझ्या परिवाराची आणि समाजाजी बदनामी केली जात आहे. राज्यात त्याबद्दल घाणेरडं राजकारण केलं जात आहे, हे दुर्देवी आहे. मी भटक्या जमातीतील व्यक्ती समाजकारणातून राजकारणात आलो. गेले ३० वर्ष मी समाजासाठी जनतेसाठी काम करतो आहे. ओबीसी समाजाचं नेतृत्व करत आहो. पण या एका घटनेवरून विविध आरोप करून मला राजकीय आयुष्यातून उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

Edited By Rajanand More

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com