धक्कादायक : महसूलमंञी थोरातांच्या बंगल्यात आत्महत्येचा प्रयत्न  - Attempted suicide at the bungalow of  Revenue Minister Balasaheb Thorat | Politics Marathi News - Sarkarnama

धक्कादायक : महसूलमंञी थोरातांच्या बंगल्यात आत्महत्येचा प्रयत्न 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 मार्च 2021

पांडुरंग वाघ यांच्याविरोधात गावदेवी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. त्यांना अटक केली आहे.

मुंबई : महसूलमंञी बाळासाहेब थोरातांच्या अल्टामाऊट रोडवरील, राँयल स्टोन बंगल्यात एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला. अंगावर पेट्रोल ओतून स्वत:ला जाळून घेणार, तोच वेळीच पोलिसांनी त्यांना अडवलं, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. काल मंगळवारी दुपारी ही घटना घडली. 

या प्रकरणी गावदेवी पोलिसांनी पांडुरंग वाघ यांच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे. त्यांना अटक केली आहे. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. वाघ हे अहमदनगरच्या नेवासा येथील झापडी गावचे रहिवाशी आहेत. 

वाघ यांनी शासनाकडून २०१८ मध्ये शासनमिश्रीत वाळू उत्खन्न व वाहतूकीचा परवाना मिळवला होता. त्यासाठी त्यांनी सरकारकडे ८ लाख ७२ हजार भरले होते. माञ, स्थानकाच्या विरोधामुळे वाळू उपसा झाला नाही. त्यामुळे पैसे परत मिळावे, म्हणून वाघ आले होते. माञ, वाघ यांनी सनदशीर मार्गाचा अवलंब न करता सरकारला वेठिस धरण्याच्या हेतून बंगल्यातील विशेष कार्यकरी अधिकारी यांच्या दालनात अचानक अंगावर पेट्रोल ओतून घेत, स्वत:ला पेटवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून आत्महत्या करण्यापासून रोखले. या प्रकरणी वाघ यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.  

हेही वाचा : विरोधी पक्षाने काय दिवे लावले ?...शिवसेनेचा सवाल.. 

मुंबई : विधीमंडळाचे अधिवेशन नुकतेच झाले.यात विरोधी पक्षाने महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरले. अर्थसंकल्पावर चांगली चर्चा न करता एका व्यक्तींच्या मृत्यू प्रकरणी विरोधक आदळआपट करीत आहेत, यावरून सामनाच्या अग्रलेखात यावर टीका करण्यात आली आहे.संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाला जास्त जबाबदारीने वागावे लागते, पण महाराष्ट्रात विरोधी पक्षाला अशा जबाबदारीची जाणीव फारशी दिसत नाही. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवट झाला, पण सत्ताधाऱ्यांचे कामकाज रोखण्याशिवाय विरोधी पक्षाने काय दिवे लावले ? असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.  मनसुख हिरेन यांच्याप्रमाणेच मुंबईत दोन बळी गेले आहेत. अर्णब गोस्वामी याने केलेल्या छळामुळे अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली व हे प्रकरण फडणवीस मुख्यमंत्री असताना सरकारने दाबले होते. या प्रकरणाची फाईल सचिन वाझे यांनी उघडली व अर्णब गोस्वामी यास तुरुंगात टाकले. अर्णब गोस्वामी याने ‘टीआरपी’ घोटाळा करून सगळय़ांचीच फसवणूक केली. या टीआरपी घोटाळय़ाचा तपासही वाझे हेच करीत आहेत. अर्णब गोस्वामी यास आत्महत्या, टीआरपी घोटाळय़ात जाबजबाब द्यावा लागेल, सचिन वाझे त्याची गर्दन पकडतील म्हणून वाझे यांच्या विरोधात विरोधी पक्ष आदळआपट करीत आहे काय, असे अग्रलेखात म्हटलं आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख