राज्यातील भाजप नेत्याच्या गाडीवर हल्ला; पक्ष सोडण्याची धमकी   - Attack on BJP leader's car in the state | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापुरात दाखल..पुरग्रस्त भागाची पाहणी
पुणेकरांना खुशखबर : पुणे मेट्रोची शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रायल रन...पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोथरुड डेपो ते आयडीयल कॉलनीदरम्यान ट्रायल

राज्यातील भाजप नेत्याच्या गाडीवर हल्ला; पक्ष सोडण्याची धमकी  

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 1 जुलै 2021

तुझे आखरी चेतावणी दे रहा हू, बीजेपी छोड दे,  लोगों को गुमराह करना बंद कर

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या (BJp) महाराष्ट्र वाहतूक संघटनेचे नेते हाजी आराफत शेख (Haji Arafat Sheikh) यांच्या इनोवा क्रिस्टा गाडीवर हल्ला करुन पक्ष सोडण्याची धमकी देण्यात आली आहे. या हल्यात त्यांच्या गाडीचे नुकसान झाले आहे. (Attack on BJP leader's car in the state)

हेही वाचा : शरद पवार सरकारवर अंकुश ठेवण्यात कमी पडले: चंद्रकांत पाटील

हाजी आराफत शेख यांची इनोवा क्रिस्टा ही गाडी कुर्ला न्यायालयाजवळील एलबीएस रोड येथील त्यांच्या घराजवळ उभी होती. त्यावेळी गाडीची काच दोन अनोळखी व्यक्तींनी तोडली. यावेळी गाडीमध्ये प्लास्टिक पिशवीत एका पेव्हर ब्लाँक आणि शेख यांच्या नावाने लिहिली धमकीची चिठ्ठी सापडली.

या चिठ्ठीत म्हटले आहे की "तुझे आखरी चेतावणी दे रहा हू, बीजेपी छोड दे,  लोगों को गुमराह करना बंद कर, समजायाता तेरे को लेकीन समज नही आ रहा है!  अगली बार पथर नही कुछ और होगा. सुधरजा  नही तो जान से हाथ धो बैठेगा. परिवारलोकी सोच अगली बार मौका नही दुगां, कांदे लिंबू की बरसात करूंगा ये आखरी चान्स है!  बीजेपी छोड...."

हेही वाचा : पुलाच्या उद्घाटनावरुन सत्ताधारी भाजप अन् राष्ट्रवादी आमनेसामने

या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणा विषयी बोलताना शेख म्हणाले की, मला अनेक दिवसापासून धमक्या येत आहेत. भाजप मध्ये आल्या पासून पक्ष सोडण्यासाठी दबाव टाकला जात आहे. काल रात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गाडी फोडून धमकी दिली. मी काम करत राहणार, मी काम करत असल्यामुळे काही लोकांच्या मनात खदखद वाढली आहे, असेही शेख यांनी सांगितले.  

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख