अस्मा शेखला वसतीगृह मिळाले; शिक्षणाचा प्रश्न शिवसेनेमुळे सुटला

तिची शिक्षणाची आवड पाहून युवासेनेने तिच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली व तिला एक लाख रुपयांचा निधी दिला आणि अन्य साह्यदेखील केले. तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी चर्चगेटच्या के. सी. कॉलेजने घेतली.
arvind sawant meets uday samant.jpeg
arvind sawant meets uday samant.jpeg

मुंबई : आझाद मैदानासमोरच्या पदपाथवर राहून दहावीत चांगले यश मिळविणाऱ्या अस्मा शेख या विद्यार्थीनीला खासदार अरविंद सावंत यांच्या प्रयत्नांमुळे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मुलींच्या शासकीय वसतीगृहात प्रवेश दिला. 

अस्मा शेख हिचे वडील आझाद मैदानासमोरील पदपाथवर लिंबू सरबत विकण्याचा व्यवसाय करीत होते. तशाच अवस्थेत तिने पदपाथवर झोपडीत राहून त्याच अवस्थेत शिकून दहावीत यश मिळवले. शालेय शिक्षण पूर्ण झाले, मात्र तिला महाविद्यालयात जायचे होते, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची तिची इच्छा होती. पण खर्चिक असलेले पुढील उच्चशिक्षण कसे घ्यायचे हा प्रश्न तिच्यापुढे होता. पुढे काय करावे हे तिच्या कुटुंबियांना कळत नव्हते. अशा स्थितीत युवासेनेमुळे तिला आशेचा किरण दिसला. 

तिची शिक्षणाची आवड पाहून युवासेनेने तिच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली व तिला एक लाख रुपयांचा निधी दिला आणि अन्य साह्यदेखील केले. तिच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी चर्चगेटच्या के. सी. कॉलेजने घेतली. महाविद्यालय प्रवेशाचा प्रश्न सुटला तरी तिचा राहण्याचा प्रश्नही होता. तिने हा प्रश्न सावंत यांना सांगताच सावंत यांनी पुढाकार घेऊन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. 

अस्मासारख्या गुणी विद्यार्थिनीला मुंबईतील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यासाठी सहकार्य करावे अशी विनंती त्यांनी सामंत यांना केली. त्यावेळी सामंत यांनी माहिती घेऊन तिला मरीन ड्राईव्ह वरील सावित्रीबाई फुले हॉस्टेल मध्ये आपल्या मंत्री कोट्यातून जागा दिली. सध्या हे वसतीगृह कोविड विलगीकरण केंद्र म्हणून तयार केले आहे. तेथील कोवीड सुविधा हटवली की तत्काळ तिला वसतीगृहात प्रवेश देण्यात येईल, असेही आश्वासन सामंत यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com