मोठी बातमी : मुंबईत पकडलेल्या दहशतवाद्यांना दाऊदचा भाऊ अनिस पैसे पुरवत होता!

सौदेबाजी, वसुलीबाजी करताना आमच्या पोलिसांच्या डोक्यावर मिऱ्या वाटाव्यात, असे राज्य सरकार वागत आहे.
 Ashish Shelar .jpg
Ashish Shelar .jpg

मुंबई : दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईतून जान मोहम्मद शेख याला अटक केल्यानंतर या मुद्द्यावरून आता राजकीय वातावरण तापू लागले आहे. दहशतवादी मुंबईत वास्तव्य करून दहशतवादी कट करत असताना राज्याचे एटीएस झोपले होते का, या दहशतवाद्यांच्या बाबतीत राज्यातले पोलिस काय करत होते? असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारला केला आहे. (Ashish Shelar criticizes the state government) 

यासंदर्भात शेलार यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी शेलार म्हणाले, दहशतवाद्यांचे प्रशिक्षण पाकिस्तानात झाले. दाऊदचा भाऊ अनिस अहमद त्यांना पैसा पुरवत होता, असे शेलार यांनी यावेळी सांगितले. उत्सव काळात घातपाताचा कट करणाऱ्या दहशतवाद्यांना दिल्लीच्या विशेष पथकाने अटक केली. जान मोहम्मद शेख आणि समीर या दोघांना महाराष्ट्रातून अटक केली. त्यातल्या एकाला धारावीत अटक केली. हिंदूंच्या सणांवर दहशतवादी हल्ला करण्याचा कट करणाऱ्या दहशतवाद्यांना अनिस पैसा पुरवत होता. यांचे प्रशिक्षण पाकिस्तात झाले, असे शेलार म्हणाले. 

विशिष्ट वर्गासाठी राज्य सरकार मवाळ भूमिका तर घेत नाही ना? अशी शंका उपस्थित केली आहे. मुंबईतील, धारावीत अशा दहशतवाद्यांचा निवास, कटकारस्थान सुरू होते. दिल्लीहून येऊन विशेष पथकाने त्यांना अटक केली तर मग राज्यातले एटीएस काय झोपले होते का असा सवाल त्यांनी केला. अदखलपात्र गुन्ह्यात केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे आणि पत्रकारांना हात नाही पाय लावू असे म्हणणारे व राज्यातल्या विद्यमान आमदाराविरोधात लुकआऊट नोटीस काढणारे आमचे पोलिस या दहशतवाद्यांच्या बाबतीत काय करत होते. याची माहिती राज्याच्या पोलिसांना आणि गृहमंत्र्यांना होती का, असेही शेलार म्हणाले. त्यावर त्यांनी काय भूमिका घेतली? की मग विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका, असे राजकीय प्रकरण तर नाही ना? असेही शेलार म्हणाले. 

नको त्या कामात पोलिसांना गुंतवले जात आहे. पोलिसांचे लक्ष राज्यकर्ते नको त्या विषयात घालायला लावतात, तेव्हा गंभीर विषयांकडे पोलिसांचे दुर्लक्ष होते हे आपल्याला दिसत आहे. आमचे पोलिस खाते खुप क्षमतावान आहे. त्यांचे कर्तृत्व मोठे आहे. मात्र, सौदेबाजी, वसुलीबाजी करताना आमच्या पोलिसांच्या डोक्यावर मिऱ्या वाटाव्यात, असे राज्य सरकार वागत आहे. तेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते, असेही आशिष शेलार यांनी म्हणाले.

दरम्यान, यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भूमिका स्पष्ट करावी. या गंभीर विषयावर एका गृहमंत्र्यांनी आपल्या इंटेलिजन्स फेल्युअरवर आणि इतर मुद्द्यांवर भूमिका स्पष्ट करावी. अजून काही अशी लोक राज्यात लपली आहेत का? याबाबतीतली चौकशी वाढवावी असे ते म्हणाले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com