मुंबई : खाली डोकं वर पाय अशी अवस्था शिवसेनेची झाली. परदेशातून कोणी देशावर टीका केली तर शिवसेनेला आनंदाच्या उकळ्या फुटतात. लाल किल्ल्यावर झालेल्या आंदोलनाला राऊतांचं समर्थन आहे का? उलट त्यांनी परदेशातील व्यक्तींवर टीका करायला पाहिजे. त्यांच्यावर टीका करायला तोंड शिवलंय का? असा सवाल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलताना शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
दुसऱ्याच्या कुबड्या घेऊन हिंदुत्वावर बोलन म्हणजे सूर्यावर थुंकण्यीसारखं आहे. राम वर्गणीला विरोध करायचा आणि गरीब माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून हप्ता वसुली करायची यात त्यांना मर्दुमकी वाटते. राम मंदीर वर्गणीवर टीका करायची आणि रस्त्यावर पोट भरणाऱ्या लोकांच्या तोंडचा घास पळवायचा याचा निषेध आहे, असे शेलार म्हणाले. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांचा फोटो त्यांच्या परवानगीने वापरला का नाही माहित नाही? पण हप्ता वसुलीसाठी मुख्यमंत्र्यांचा फोटो वापरला जात असेल, तर त्यावर तातडीने कायदेशीर आणि पक्षांतर्गत कारवाई व्हावी, अशी मागणी शेलार यांनी केली. शिवसेना अमिबा रूपी झाली आहे. सातत्यानं भूमिका बदलत आहेत. आता आमिबालाही लाज वाटेल, असा आरोप शेलारांनी केला.
महाविकास आघाडी सरकार हिंदूंचा अपमान करणार्या शरजील उस्मानीला पळून जाण्यास मदत करत असल्याचा आरोप करत शरजीलने केलेल्या अपमानास्पद टिप्पणीची तुलना इतर कोणाशी करणे, याचा अर्थ यांचे डोके ठिकाणावर आहे का, असा प्रश्न विचारण्यासारखा आहे. भाजपचे दोन दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने पावले उचलायला सुरुवात केली. भाजपने मागणी लावून धरल्यानंतर अटक करण्यासाठी कारवाई केली जात आहे. मूळात परिषदेला परवानगींच का दिली? असा सवाल आशिष शेलाक यांनी केला.
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प म्हणजे बनवाबनवी आणि लपवाछपवी आहे. मुंबईकराचा अर्थसंकल्प आहे की बालहट्टाचं घोषणापत्र हे कळायला मार्ग नाही, असा टोला शेलार यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे. पाचशे फुटांच्या घराचा कर माफ करण्यात आला नाही. मुंबई महापालिकेला मजबूत करणे ही भाजपची भूमिका आहे. परंतु आता कच्चा अभ्यास करून निर्णय घेतला. कच्चा अभ्यास करून सोडवलेल्या प्रश्नपत्रिका सारखा हा निर्णय आहे.
यावेळी धनंजय मुंडे यांच्या प्रश्नावर बोलताना शेलार म्हणाले, धनंजय मुंडे यांनी तातडीने स्पष्टीकरण द्यावं महिलेची तक्रार खरी असेल तर चौकशी करावी, पण याची संपूर्ण माहिती मला नाही.
Edited By - Amol Jaybhaye

