0Sarkarnama_20Banner_20_202021_05_05T093157.449_1 (2).jpg
0Sarkarnama_20Banner_20_202021_05_05T093157.449_1 (2).jpg

मराठा वोट बँक तुटण्याची काँग्रेस, राष्ट्रवादीला भीती

मराठा आरक्षण मिळू नये, असे काँग्रेस, राष्ट्रवादीला वाटते

सांगली : ‘‘मराठा आरक्षण प्रश्‍नी राज्य सरकारने खेळखंडोबा केला आहे. भाजप सरकारने आरक्षण दिले, ते उच्च न्यायालयात टिकले, सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती द्यायला नकार दिला. मराठा समाजाला भाजपने न्याय दिला, मात्र त्यामुळे मराठा वोट बँक आपल्याकडून तुटेल, अशी भीती काँग्रेस Congress, राष्ट्रवादीला Ashish Shelarवाटते आहे,'' असे मत भाजपचे नेते आशिष शेलार Ashish Shelar यांनी व्यक्त केले. पश्‍चिम महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या शेलार यांनी कोरोना, लसीकरण, मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या विषयावर सरकारवर टीकास्त्र सोडले. Ashish Shelar criticism of Congress and NCP

शेलार म्हणाले, "मराठा आरक्षण मिळू नये, असे काँग्रेस, राष्ट्रवादीला NCP वाटते. त्यांनी न्यायालयात योग्य रणनीती वापरली नाही. आम्ही या प्रश्‍नी समाजासाठी लढणाऱ्या प्रत्येकाला साथ देऊ. राज्य सरकारने बोटचेपे धोरण राहिले तर भाजप अजून आक्रमक होईल. ओबीसी आरक्षण प्रकरणातही सरकार भ्रम पसरवत आहे.’’

ठाकरे सरकारने महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी बनविले आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित, सक्रिय रुग्ण आणि मृत्यूचे प्रमाण दुर्दैवाने महाराष्ट्रात सर्वाधिक आहे, अशी जोरदार टीका भाजप आशिष शेलार यांनी केली. ‘‘नाना पटोले नेहमीच विनोदी वाक्यरचना करत असतात. सभागृहात फोन टॅपिंगविषयी त्यांनी जी माहिती दिली ती त्यांनी काही तासांत बदलली. हवामान बदलावे तसे ते बदलतात. त्यांना पश्‍चात बुद्धी का होते, हे तपासावे लागेल,'' असे शेलार म्हणाले.

शेलार म्हणाले, ‘‘देशातील एकूण संख्येपैकी २० टक्के रुग्ण, २३ टक्के सक्रिय रुग्ण, ३० टक्के मृत्यू महारष्ट्रात आहेत. १ लाख २१ हजार ९४५ पैकी ६७ हजार २९६ मृत्यू महाराष्ट्रात आहेत. या संकटात ठाकरे सरकार कुठेही सकारात्मक दिसले नाही. पहिल्या लाटेत वैद्यकीय सेवा उभी करण्यात आणि दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनपासून आवश्‍यक सुविधा पुरवण्यात सरकार कमी पडले. देशात महाराष्ट्राला गालबोट लागले. ठाकरे सरकार रक्तपिपासू शक्ती आहे. शेतकरी प्रश्‍न, पीक विमा, कर्जमाफी, बोगस बियाण्यांची चौकशी, एमपीएसीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, लटकलेले दहावी-बारावीचे विद्यार्थी यावर सरकार काहीच करत नाही. सगळा खेळखंडोबा सुरू आहे.’’

महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न संपल्याचा केंद्रीय मंत्र्यांना साक्षात्कार 
बंगळूर : बिदर भागातील मराठी मतांवर निवडून आलेले खासदार व नूतन केंद्रीय मंत्री भगवंत खुबा यांना मंत्रिपदावर जाताच महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्न संपल्याचा साक्षात्कार झाला आहे. येथील एका इंग्रजी वृत्तपत्राने घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी सीमावाद एक संपलेला अध्याय असल्याचे म्हटले आहे. 
Edited by : Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in