अमित शहांच्या कार्यक्रमात दोन गुंड स्टेजवर

शिवसेनेची शिडी घेऊन महाराष्ट्रात भाजप उभी राहीली. राणे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा. जिकडे सत्ता तिकडे ते असतात, अशी टीका शिवसेना खासदार अररिंद सावंत यांनी केली.
Narayan Rane, Arvind Sawant, Devendra Fadnavis .jpg
Narayan Rane, Arvind Sawant, Devendra Fadnavis .jpg

मुंबई : अमित शहांच्या कार्यक्रमात दोन गुंड स्टेजवर एकत्र होते. सरड्याला लाज वाटेल एवढे रंग व्यासपीठावर बसलेल्यांनी बदलले, शिवसेनेची शिडी घेऊन महाराष्ट्रात भाजप उभी राहीली. राणे म्हणजे आयत्या बिळावर नागोबा. जिकडे सत्ता तिकडे ते असतात, अशी टीका शिवसेना खासदार अररिंद सावंत यांनी केली. 

सिंधुदुर्ग येथे अमित शहांच्या हस्ते भाजप खासदार नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन झाले, त्यावेळी शहा म्हणाले की, शिवसेनेला मुख्यमंत्रीपदाचा शब्द कधीच दिला नव्हता. बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वांना तापी नदीत बुडवले आणि सत्तेवर जाऊन बसले. आम्ही तुमच्या मार्गाने चालत नाही. तुमच्या मार्गाने चाललो असतो तर महाराष्ट्रात शिवसेनाच उरली नसती, अशी टीका शहा यांनी केली होती. 

त्यावर सावंत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, महाराष्ट्रात शिवसेनेची शिडी घेऊन व शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने राज्यात भाजप वाढत गेली. भाजप वाढली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, यापुढे ५०-५० टक्के सत्तेचे वाटप करण्यात येईल. त्या नंतर विधानसभा निवडणुकीत जागा कमी झाल्यावर त्यांची भाषा बदलली, कमी महत्त्वाची खाती शिवसेनेला देऊ केली होती, असे सावंत यांनी सांगतिले. 

भाजप हा गुंडांचा पक्ष आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले होते. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे कसे गुंड आहेत, त्यांनी काय-काय गुन्हे केले आहे, हे विधानसभेत सांगितले होते. त्यामुळे एकमेकांना गुंड म्हणारे, दोन गुंड अमित शहांच्या स्टेजवर होते, असा आरोप सावंत यांनी केला.  

आज राज्यसभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात एक आंदोलनजीवी जमात आली असल्याचे म्हटले होते. त्यावर सावंत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, भाजपने रथयात्रा काढली तेव्हा भाजप आंदोलनजीवी नव्हती का? रथयात्रा आंदोलन नव्हतं का? स्मृती इराणींनी महागाईवर आंदोलन केलं मग त्या परजीवी आहेत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. भाजपने विरोधी पक्षात असाताना कृषी कायद्यांना विरोध केला होत. त्यावेळी शेतकरी आडत्यांचं एटीम असल्याची टीका सुषमा स्वराजांनी केली होती, मग आता कृषी कायदे बरोबर कसे आहेत, असे ते म्हणाले.  

Edited By - Amol Jaybhaye  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com