धक्कादायक : माजी व्यवस्थापकानेच केला बँक लुटण्याचा प्रयत्न.. व्यवस्थापक महिलेचा मृत्यू  - armed attack on a bank in virar manager killed robbery-mm76 | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

आमदार आशुतोष काळे शिर्डी संस्थानचे अध्यक्ष तर उपाध्यक्षपदी जगदीश सावंत यांची नियुक्ती
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली
जगातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये नरेंद्र मोदी, ममता बॅनर्जी, अदर पूनावाला
तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांची वर्णी
अभिनेता सोनू सूदच्या घरावर आयकर विभागाचा छापा

धक्कादायक : माजी व्यवस्थापकानेच केला बँक लुटण्याचा प्रयत्न.. व्यवस्थापक महिलेचा मृत्यू 

चेतन इंगळे
शुक्रवार, 30 जुलै 2021

एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे..

वसई/ विरार : विरार येथील आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थपकानेच बँक लुटण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोन महिला कर्मचारी गंभीर जखमी झाल्या असून एका महिलेचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन दरोडेखोरांनी हा सशस्त्र दरोडा टाकून, सोने आणि पैशाची बॅग घेऊन  फरार होत असताना एका दरोडेखोराला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे..

‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ शिवसेनेची पंतप्रधानांवर टीका

यावेळी त्याने केलेल्या चाकू हल्ल्यात बँकेच्या व्यवस्थापक महिलेचा मृत्यू झाला तर अन्य महिला जखमी झाली. हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. काल रात्री ८ च्या सुमारास ही घटना घडली.  

अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकच्या निवडणुका

विरार पूर्वेच्या स्टेशन परिसरात मनवेल पाडा येथे आयसीआयसीआय बँक आहे. गुरुवारी संध्याकाळी बँक बंद झाल्यावर सर्व कर्मचारी निघून गेले होते. त्यावेळी बँकेत रोखपाल  श्वेता देवरूख  (32) आणि व्यवस्थापंक योगिता वर्तक (34) या दोघीच होत्या. रात्री 8 च्या सुमारास बँकेचा माजी व्यवस्थापक अनिल दुबे बँकेत आला. त्याने चाकूचा धाक दाखवत बँकेतील रोख रक्कम आणि दागिने लुटण्याचा प्रयत्न केला. या वेळी दोघींनी विरोध केला. दुबे याने दोघींवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात व्यवस्थापक योगीता वर्तक यांचा जागीच मृत्यू झाला तर रोखपाल श्वेता गंभीर जखमी झाल्या. हल्ला करून पाळणाऱ्या आरोपी दुबे याला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

हेही वाचा : पोलिस उपायुक्त मॅडमला हवी आहे, चिकण बिर्याणी तीही मोफत 

पुणे : लाचखोर अन् कामचुकार अधिकाऱ्यांबाबत आपण नेहमीच ऐकतो, पण एका महिला पोलिस Pune Police अधिकाऱ्याला पुण्यातील प्रसिद्ध हाँटेलची बिर्याणी Biryani मोफत हवी आहे. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्याशी केलेले फोनवरील संभाषण सध्या खूप व्हायरल होत आहे. पुण्यातील पोलिस आयुक्त DCP असलेल्या या अधिकाऱ्यांच्या अशा कारभाराला वैतागलेल्या कर्मचाऱ्याने त्यांची तक्रार थेट पोलिस महासंचालकाकडे केली आहे. त्या कर्मचाऱ्याने याबाबतचे पत्र आणि ती मोफत बिर्याणीची मॅडमची फर्माईशची आँडिओ क्लिप audio clipपोलिस महासंचालकांना पाठविली आहे.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख