राजकारण टाळून कोरोना रोखण्यासाठी समिती नेमा..राऊतांचा केंद्र सरकारला सल्ला - Appoint a committee to stop Corona without bringing politics Sanjay Raut  | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

राजीव सातव यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 17 मे) रोजी सकाळी दहा वाजता कळमनुरी (जि. हिंगोली) येथे अंत्यसंस्कार होणार.
राजीव सातव यांचे कोरोनाने निधन

राजकारण टाळून कोरोना रोखण्यासाठी समिती नेमा..राऊतांचा केंद्र सरकारला सल्ला

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 मे 2021

"महाराष्ट्राची जनता गेल्या दोन वर्षापासून संकटात आहे,

मुंबई : "कोरोनाची स्थिती पाहता सर्वोच्च न्यायालय आता सक्रिय झाले आहे. ही चांगली गोष्ट आहे, हे आधी व्हायला पाहिजे होते. आता अनेक राज्याची परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे. याबाबात केंद्र सरकारने एक समिती नेमून कोणत्या राज्यात काय सुरू आहे, यांची माहिती घेऊन उपाययोजना केल्या पाहिजे," असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज व्यक्त केलं आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

केंद्र आणि राज्य यांनी कोरोना उपाययोजनांमध्ये राजकारण न आणता न्यायालयाच्या माध्यमातून ही समिती नियुक्ती केली पाहिजे, या समितीत राजकारण, भेदभाव न प्रत्येक व्यक्तीचा प्राण महत्वाचा असल्याचे दाखवून दिले पाहिजे, महाराष्ट्राला ज्या प्रमाणात लशींचा पुरवठा व्हायला पाहिजे, त्या  तुलनेत होत नाही. महाराष्ट्र यासाठी झगडतो, लढतो आहे. केंद्र सरकारच्या हाताबाहेर ही स्थिती न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलं आहे. ही राष्ट्रीय आपत्ती आहे असं जर आपण जर मानलं केंद्र सरकारने या समितीची नियुक्ती केली पाहिजे. म्हणजे कोणावरही अन्याय होणार नाही. केंद्राकडून नियोजन योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे, असे राऊत म्हणाले.

"महाराष्ट्राची जनता गेल्या दोन वर्षापासून संकटात आहे, महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन हा उत्साहाचे शौर्याचे प्रतीक आहे, गेली दोन वर्षे आपण साजरा करू शकलो नाही, महाराष्ट्राला लढण्याची परंपरा आहे, पण त्यातून देखील आपण बाहेर पडू, आणि पुढच्या वर्षी उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करू," असे राऊत यांनी सांगितले. 

पत्रकारांसाठी विशेष योजना आणा
कोरोनाकाळात ५८ पत्रकारांचा मृत्यू झाला, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले की,  माझ्या सामना मधल्या तीन पत्रकारांना कोरोनामुळे मुकावे लागले आहे, पत्रकार हा सुद्धा अत्यावश्यक सेवेत येतो, पत्रकारामुळे लोकशाही आणि स्वातंत्र्य जिवंत आहे. त्यांच्या कामासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी असे मला वाटते, या त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने पत्रकारांसाठी विशेष योजना आणावी, विषयावरची मी आज किंवा उद्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख