चिंता वाढली ,"कोरोना पॉझिटिव्ह'ना मुंबईत रुग्णालयच मिळेना !

उपचारासाठी मुंबईत बेड मिळत नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय.
चिंता वाढली ,"कोरोना पॉझिटिव्ह'ना मुंबईत रुग्णालयच मिळेना !

मुंबई : कोरोनाचा संसर्ग मुंबईत झपाट्याने वाढू लागला आहे. त्याचप्रमाणे मृत्यूचा आकडाही वाढतांना पहायला मिळतोय. अशा अवस्थेत मुंबईतील अनेक करोना पॉझिटिव रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटल मिळत नाहीत. 

त्यामुळे कित्येक दिवस हॉस्पिटल मिळेल या आशेने अनेक रुग्ण घरीच आहेत. पर्यायाने काही रुग्णांचा मृत्यूसुद्धा होताना पाहायला मिळतोय. सरकार अनेक वेळा हॉस्पिटल तयार करत असल्याची घोषणा करत आहे.

मात्र प्रत्यक्षात आता रुग्णांना एकही बेड मिळत नाही. अशी अवस्था मुंबईत आहे. जी अवस्था सरकारी हॉस्पिटलमधील आहे. तीच अवस्था उच्चभ्रूसाठी असलेल्या खाजगी हॉस्पिटलची सुद्धा पाहायला मिळतेय. 

त्यामुळे मध्यमवर्गीय रुग्णाप्रमाणे श्रीमंतांना सुद्धा करोणाच्या उपचारासाठी मुंबईत बेड मिळत नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यूचं प्रमाण वाढताना पाहायला मिळतंय. 

दृष्टिक्षेपात रुग्णालये 

लीलावती रुग्णालय 323 बेड त्यापैकी फक्त 27 बीड करोनासाठी 

कोकिलाबेन- 750 बेड पैकी 17 करोनासाठी 

नानावटी 425 पैकी 108 करोनासाठी 

बॉम्बे हॉस्पिटल 830 पैकी 100 बेड करोनासाठी 

जसलोक रुग्णालयात 364 पैकी 25 बेड करोनासाठी 

वोकहार्ट रूग्णालयात 350 पैकी 24 बेड करोनासाठी 

- फोर्टिस रुग्णालयात 300 पैकी फक्त 15 बेड 

- हीरानंदनी रुग्णालयात 240 पैकी 35 बेड करोनासाठी 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com