मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अडसूळ यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आंनदराव अडसूळ यांचा सहभाग आहे का?. याची चौकशी करण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे.
तसेच त्यांनी बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या एचडीआयएल या कंपनीकडून देणगी स्वीकारल्याचाही गंभीर आरोप केला आहे. या सर्व आरोपांची चौकशी करण्याची विनंती सोमय्या यांनी सक्तवसुली संचालनालय (ED) आणि भारतीय रिझर्व्ह बँकेला केली आहे. किरीट सोमय्या यांच्या या मागणीमुळे अडसूळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. सोमय्या यांनी ही माहिती टि्वटर वरुन दिली आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नंतर आता आनंदराव अडसूळ यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले आहेत. सोमय्या यांनी स्व:त अडसूळ यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी ईडी आणि आरबीआयला केली आहे. सिटी सहकारी बँकेच्या घोटाळ्यात आनंदराव अडसूळ आणि त्यांच्या परिवाराची भूमिका असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच एचडीआयएल या बांधकाम क्षेत्रातील कंपनीकडून त्यांनी 1 कोटी रुपयांची देणगी स्वीकारल्याचंही सोमय्या यांनी म्हटलंय. त्यामुळे आनंदराव अडसूळ यांच्या अडचणी वाढणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मी ED आणि RBI ला विनंती केली आहे
शिवसेना नेता श्री आनंद अडसूळ व परिवराचा
१. एचडीआयएलकडून HDIL ₹१ कोटी किकबॅक / देणगी (पीएमसी बँक चा पैसा)
२. सिटी City सहकारी बँकेच्या घोटाळ्यात त्यांची भूमिका
तपास करावा@BJP4Maharashtra@BJP4India @Dev_Fadnavis pic.twitter.com/sVuxvFMDeX
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 16, 2021
आता या तक्रारी नंतर अडसूळ यांची चौकशी झाली. तर, शिवसेनेच्या आणखी एका नेत्याला ईडी चौकशीला सामोर जावे लागेल. या आधी शिवसेना नेते प्रताप सरनाईक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली आहे.
आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आमदार रवी राणा यांनी 5 जानेवारी रोजी केला होता. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्रं सादर करण्यासाठी ईडी कार्यालयात आलो असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. “सिटी को-ऑप बँकेच्या मुंबईमध्ये 13-14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार आहेत. ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटलेली कर्ज कारणीभूत आहे,” असा आरोप रवी राणांनी केला होता. तसेच, आनंदराव अडसूळांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. आता खातेदारांना केवळ 1 हजार एवढी रक्कम मिळत आहे, असंही रवी राणा म्हणाले होते.

