चित्रा वाघ यांच्यावर भाजपची आणखी एक मोठी जबाबदारी  - Another big responsibility of BJP on Chitra Wagh | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

मंत्रिमंडळाची बैठक सुरु असताना जयंत पाटलांची प्रकृती बिघडली...ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल

चित्रा वाघ यांच्यावर भाजपची आणखी एक मोठी जबाबदारी 

सरकारनामा ब्यूरो
बुधवार, 30 जून 2021

चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून वाघ यांना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीविषयी कळवले आहे.

मुंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आणखी एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. महाराष्ट्र भाजपच्या युवती विभागाच्या प्रभारीपदाची जबाबदारी वाघ यांना देण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्र लिहून वाघ यांना देण्यात आलेल्या नव्या जबाबदारीविषयी कळवले आहे. (Another big responsibility of BJP on Chitra Wagh)

हेही वाचा : फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच; त्यामुळे मराठी माणसाचा जाच तरी संपेल

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाघ यांनी अनेक वर्षे काम केले. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. मात्र, 2019 च्या  विधानसभेच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनेही त्यांच्यावर प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यातच आता पुन्हा एक जबाबदारी देण्यात आली आहे.  

चंद्रकांत पाटील यांचे पत्र

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी मोठ्या जिद्दीने आणि अत्यंत कुशलतेने पार पाडत आहात. गेली अनेक वर्ष आपण सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्षमपणे कार्यरत आहात. युवती व महिला यांच्या विषयातील प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन आपल्याकडे ''भाजप महाराष्ट्र युवती विभागाच्या प्रभारी'' म्हणून विशेष जबाबदारी सोपविण्यात येत आहे. आगामी काळात आपण आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडाल व त्याचा संघटनेला निश्चित फायदा होईल, असा मला विश्वास असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : महाविकास आघाडीत मोठी घडामोड : शिवसेना आमदारांना व्हीप जारी....

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशने माझी भाजपा महाराष्ट्र–युवती विभागाच्या प्रभारी म्हणून नियुक्ती केली. पक्षाने दिलेली ही जबाबदारी मी उत्तमरीत्या पार पाडेन हा विश्वास देते, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. तर चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

 Edited By - Amol Jaybhaye

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख