निनावी कॉलने मुंबई पोलिस दलात उडाली खळबळ

एका निनावी कॉलवरून शहरात चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली होती.
 Mumbai, Police .jpg
Mumbai, Police .jpg

मुंबई : मुंबई पोलिस कंट्रोलमध्ये (Police Control Room) काल रात्री (ता. ६ ऑगस्ट) आलेल्या निनावी कॉलमुळे शहरात आणि पोलिस विभागामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. एका निनावी कॉलवरून शहरात चार ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे सर्वत्र धावाधाव सुरू झाली. ज्या नंबरवरून कॉल आला, त्या व्यक्तीने मला डिस्टब करू नका मी फक्त माहिती दिली. असे सांगत फोन बंद केला होता. (An anonymous call caused a stir in the Mumbai police force) 

मुंबईत लोकल स्थानकांवर बाँम्ब ठेवल्याची अफवा पसरवल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील सीआययू पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यामद्ये राजू कांगणे आणि रमेश शिरसाठ या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.  

दरम्यान, मुंबईमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन आल्यानंतर तातडीने बॉम्ब स्कॉड आणि जीआरपी टीम कडून तपासणी सुरू करण्यात आला. मुंबई मध्ये बॉम्ब ठेवल्याच्या स्थळांमध्ये सीएसएमटी, भायखळा, दादर रेल्वे स्टेशन व अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याचा (Amitabh Bachchan's Bungalow) समावेश होता. 

रेल्वे पोलिसांनी बॉम्ब स्कॉड आणि डॉग स्कॉडसोबत या ठिकाणी दोन तास सर्च ऑपरेशन केले. मात्र, ही केवळ अफवा असल्याने तेथे काहीच सापडलेले नाही. या ठिकाणी अधिक सुरक्षा तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com