अनिल परब म्हणतात, "त्या पोपटात भाजपचा जीव, तो पोपट आता पिंजऱ्यात '  - Anil Parab says, "BJP's parrot is now in a cage" | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल परब म्हणतात, "त्या पोपटात भाजपचा जीव, तो पोपट आता पिंजऱ्यात ' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 4 नोव्हेंबर 2020

गोस्वामींना भाजपचे केंद्रीय नेते, मंत्री तसेच राज्यातील नेतेही पाठिंबा देत आहे

मुंबई : अर्णब गोस्वामी हे भाजपचे सदस्य आहे का ? भाजप नेते का त्यांच्यासाठी गळा काढत आहेत असा सवाल शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. 

रायगड जिल्ह्यातील नाईक मृत्यूप्रकरणी गोस्वामींना पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यात सर्वच पक्षाचे नेते आरोपप्रत्यारोप करू लागले आहेत. गोस्वामींना भाजपचे केंद्रीय नेते, मंत्री तसेच राज्यातील नेतेही पाठिंबा देत आहे.

भाजपचे आणखी एक माजी खासदार किरीट सोमैय्या हे गोस्वामींना भेटण्यासाठी रायगडलाही रवाना झाले होते मात्र त्यांना पोलिसांनी अडविले. अर्णब गोस्वामींच्या अटकेनंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी भाजपला लक्ष्य केले. 

परब म्हणाले, की 2018 मध्ये नाईक मृत्यूप्रकरणी अर्णव गोस्वामी यांना अटक झाली आहे. नाईक यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या पत्नीने पाठपुरावा केला होता. अर्णब यांचा वृत्तपत्र स्वातंत्र्याशी काय संबध आहे. ते भाजपचे कार्यकर्ते आहे का ? त्यांच्यासाठी का गळा काढला जात आहे. भाजपचे कार्यकर्ते का या कारवाईचा विरोध करत आहेत असा सवालही त्यांनी केला. 

अर्णब खूनी माणूस आहे. अशा खुनी माणसाला वाचवण्याचा काम भाजप करतंय. या घटनेशी आणीबाणीचा काय संबंध काय ? असा सवाल करून परब म्हणाले, महाराष्ट्रातील महिलेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र पोलीस करत आहेत. गोस्वामीला केवळ अटक केली आहे.. तो गुन्हेगार नाही.. अजून कारवाई व्हायची आहे.. चोकशी होऊ द्या. 2 वर्ष ती महिला न्यायासाठी सगळ्याची दार ठोठावत होती. तरीही तिला न्याय मिळाला नाही. 

तरुण तेजपालला अटक केली तेव्हा कोणी आक्षेप का घेतला नाही ? गोस्वामी हा भाजपचा पोपट. त्या पोपटात भाजपचा जीव आहे. नाईक हे प्रकरण वेगळं आहे. भाजप रस्त्यावर का उतरते आहे. आणखी वेगळी प्रकरण बाहेर येतील याची भाजपला भिती वाटते का ? भाजपचा पोपट पिंजऱ्यात आहे. नाईक प्रकरणी पुरावे पोलिसांच्या चौकशीत समोर येतील. तत्कालीन गृहमंत्र्यांनी हे प्रकरण दाबलं की नाही हे तपासातून स्पष्ट होईलच हे सांगण्यासही परब विसरले नाहीत. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काळी फित लावावी की नाही हा त्यांचा प्रश्न असे सांगून परब म्हणाले, की अनेक घटना अशा घडल्या जेव्हा त्यांनी पूर्ण काळे कपडे घालायला हवे होते. जे प्रकरण आम्ही दाबलं ते कोणी उघड करू नये, अस भाजपचं म्हणणं आहे का ? .. तशी भूमिका भाजपने स्पष्ट करावी. हे राज्य पोलिसांचं आहे. तत्कालीन गृहमंत्यांनी हे प्रकरण दाबलं की नाही हे तपासातून स्पष्ट होईलच असे परब यांनी शेवटी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख