अनिल परब लीलावतीमध्ये; मुख्यमंत्र्यांनी रद्द केली सेना आमदारांची बैठक  - Anil Parab in Lilavati; CM cancels meeting of Sena MLAs | Politics Marathi News - Sarkarnama

अनिल परब लीलावतीमध्ये; मुख्यमंत्र्यांनी रद्द केली सेना आमदारांची बैठक 

सरकारनामा ब्यूरो 
मंगळवार, 13 ऑक्टोबर 2020

परिवहन मंत्री परब यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांची आज (ता. 13 ऑक्‍टोबर) मातोश्रीवर बैठक आयोजित केली होती. मात्र, शिवसेनेचे महत्त्वाचे नेते असलेले परब यांना रुग्णालयात दाखल करावे लागल्यामुळे आज होणारी बैठक ठाकरे यांनी रद्द केली आहे. 

राज्य मंत्रिमंडळातील दहा जणांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. यातील नऊ जणांनी कोरोनावर मात करत पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. परब हे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

परिवहन मंत्री परब यांची कोरोनाची चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, या अगोदर ठाकरे सरकारमधील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. परंतु या सर्वांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. हे सर्व मंत्री सध्या राज्याच्या मंत्रिमडळात काम करीत आहेत. 

Edited By Vijay Dudhale

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख