चुकीची माहिती देऊन शरद पवारांची दिशाभूल केली...फडणवीसांचा दावा - anil deshmukh political issue devendra fadnavis criticised sharad-pawar | Politics Marathi News - Sarkarnama

चुकीची माहिती देऊन शरद पवारांची दिशाभूल केली...फडणवीसांचा दावा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 मार्च 2021

अनिल देशमुख यांच्या आरोपावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलणे अपेक्षीत आहे, पण ते एक शब्दही बोलत नाहीत, ्असे फडणवीस म्हणाले. 

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांच्यावरील आरोप काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावले आहेत. पवारांनी देशमुख यांना क्लिनचीट दिली. शरद पवार यांचे दावे फेटाळून लावण्यासाठी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले आहे. फडणीस आज सांयकाळी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांकडे याबाबतचे पुरावे सादर करून या प्रकरणाची सीबीआयची चैाकशीची मागणी करणार आहेत 

फडणवीस म्हणाले की, शरद पवार साहेबांना चुकीची माहिती देण्यात आली. अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलणे अपेक्षीत आहे, पण ते एक शब्दही बोलत नाहीत. या प्रकरणाची चुकीची माहिती पवार साहेबांना देऊन त्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. पवारांना योग्य ती माहिती दिली गेली नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांना या प्रकरणाचं गांर्भीय नाही. त्यामुळे त याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. 

काल पवारांना योग्य ब्रिफिंग दिली जात नव्हते. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. देशमुखांना प्रोटेक्ट केलं गेलं. ता.15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असा दावाही फडणवीस यांनी कागदपत्रांच्या आधारे केला.

पोलिस आयुक्त पदावरुन हटविल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी परमबीर सिंग सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. त्यानंतर आता आणखी एक पोलिस अधिकारी न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या बदल्यांच्या सत्रात सिनिअर असूनही पोलिस महासंचालकपदी नेमणूक न झाल्याबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकारी संजय पांडेही  न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत आहेत. संजय पांडे यांना होमगार्डच्या महासंचालक पदावरून बाजूला करुन त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा कार्यभार देण्यात आला. संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी संजय पांडे एक आहेत. पण या बदल्यांमध्ये 'साईड पोस्टिंग' मिळाल्याने नाराज झालेले संजय पांडे रजेवर गेले. आपल्या सेवाज्येष्ठतेकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात असल्याचा पांडे यांनी रजेवर जाण्यापूर्वी वृत्तसंस्थेशी बोलताना आरोप केला होता. या बदल्यांमध्ये रजनीश शेठ यांच्याकडे पोलिस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख